आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी जीव वाचवून पळाल्यानंतर मुलाला पेटवले; बापाला जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती जीव वाचवून पळाली. यानंतर चिडलेल्या पतीने थेट सात वर्षांच्या पोटच्या मुलाला रॉकेल टाकून पेटवले. यात गंभीर भाजलेल्या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मुलाचा खून केल्याप्रकरणी बापाला माजलगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  
सोनवळा (ता. अंबाजोगाई) येथील सुरेश जयद्रथ मस्के हा पत्नी विद्याच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून नेहमी दोघांत वादही होत होता.  २६ मे २०१६ रोजी याच कारणावरून विद्या आणि सुरेश यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण सुरू असताना सुरेशने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती घराबाहेर पळाल्यानंतर  चिडलेल्या सुरेशने  सात वर्षांचा मुलगा यशच्याही अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये तो ८५ टक्के भाजला. २७ मे २०१६ रोजी उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरेश मस्केविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला होता.  

 
या प्रकरणी माजलगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या. ए. एस. वाघमारे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी बाजू मांडली. घटनास्थळाचा पुरावा, युक्तिवाद, साक्ष ग्राह्य धरून न्या. वाघमारे यांनी सुरेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

मृत्यूपूर्व जबाबात घेतले वडिलांचे नाव  
सुरेशने पेटवून दिलेल्या यशचा पोलिसांनी उपचारादरम्यान मृत्यूूपूर्व जबाब नोंदवला होता. यामध्ये त्याने वडिलांनीच आपल्याला पेटवून दिल्याचे सांगितले होते.  

बातम्या आणखी आहेत...