आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Shooting Of Salman Khan's 'Dabangg 3' Is Over, The Superstar Pays Tribute To The Late Actor Vinod Khanna

पूर्ण झाले सलमान खानच्या 'दबंग 3'चे शूटिंग, सुपरस्टारने दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दिली श्रद्धांजली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा आगामी चित्रपट 'दबंग 3' चे शूटिंग पूर्ण झाले आहे. रविवारी रात्री सलमानने चित्रपटाच्या रॅपअपची माहिती ट्विटरवर शेअर करत दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना श्रद्धांजली दिली आहे. झाले असे की, चित्रपटाच्या मागितलं दोन्ही पार्ट्समध्ये विनोद खन्ना यांनी सलमान खानचे पिता प्रजापती पांडे ही भूमिका साकारली होती. 27 एप्रिल 2017 ला खन्ना यांचे निधन झाले. चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टमध्ये त्यांचा भाऊ प्रमोद खन्ना यांना प्रजापती पांडेचा रोल दिला गेला आहे.  

विनोद खन्ना यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीवर पूर्ण झाले शूटिंग... 
रविवारी (6 ऑक्टोबर) विनोद खन्ना यांची 73 व्या बर्थ अॅनिव्हर्सरी होती. सलमानने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जमध्ये तो विनोद खन्ना यांची आठवण काढत म्हणाला, ही खूप आनंदाची बाबा आहे की, 'दबंग 3' चे शूटिंग व्हीके सर (विनोद खन्ना साहेब) यांच्या जन्मदिनी पूर्ण झाले. सलमान हेदेखील म्हणाला, 'दबंग 3' ने विनोदचा भाऊ प्रमोद खन्ना त्याच्या पित्याची भूमिका साकारणार आहेत.  

बातम्या आणखी आहेत...