International Special / मुस्लिम महिलांवर केलेल्या टिपण्णीमुळे शिख खासदाराने चक्क पंतप्रधानांना माफी मागण्यास सांगितले

खासदार तनमनजीत सिंग धेसीने दिड मिनीटांच्या भाषणात पंतप्रधानांना तिक्ष्ण प्रश्न विचारले

दिव्य मराठी वेब

Sep 05,2019 06:05:00 PM IST

लंडन- ब्रिटिनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन बुधवारी संसदेत प्रश्नोत्तराच्या सत्रात सामील झाले होते. पण, कंजर्वेटिव पार्टीच्या पंतप्रधान जॉनसन यांना लेबर पार्टीच्या शिख खासदार तनमनजीत सिंग धेसीच्या तिक्ष्ण प्रश्नांना सामोले जावे लागले. स्लो(बर्कशायर)चे खासदार सिंगने जॉनसनच्या 2018 मध्ये लिहिलेल्या एका लेखावरुन त्यांना माफी मागण्यास सांगितली. या लेखात जॉनसन यांनी 'हिजाब' घातलेल्या मुस्लिम महिलांची तुलना दरोडेखोर आणि लेटर बॉक्सशी केली होती. सिंगने जॉनसन यांना विचारले की, पंतप्रधान आपल्या अपमानजनक आणि नक्षलवादी वक्तव्यावर कधी माफी मागणार. सिंगच्या या प्रश्नावर हाउस ऑफ कॉमन्समध्ये सर्वांनी ताळ्या वाजवल्या.


जॉनसन यांनी ऑगस्ट 2018 मध्ये 'द टेलीग्राफ'मधील एका कॉलममध्ये मुस्लिम महिलांविरोधात अपमानजनक टिप्पणी केली होती. यात त्यांनी 'बुरखा बॅन'चे समर्थन केले होते. ब्रिटेनमध्ये जॉनसनच्या या टिप्पणीची निंदा करण्यात आली होती.


बुरखा घालने म्हणजे, टीका सहन करायच्या का- सिंग
सिंग यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "जर मी पगडी घालण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही क्रॉस घालण्याचा निर्णय घेता. जर त्या किपाह घालण्याचा निर्णय घेतात, किंवा त्या हिजाब किंवा बुरखा निर्णय घेतात, तर हा काय या सदनातील सदस्यांसाठी टीका करण्याची संधी आहे का."


आम्हाला मुस्लिम महिलांचा त्रास माहिती- सिंग
सिंह पुढे म्हणाले, "आमच्यासारखे युवा लोक, त्यांना टॉवेल हेड, तालिबान, बोंगो-बोंगो लँड, असे म्हणून हिनवले जाते. आम्ही या गोष्टींचा सामना केला आहे. आम्हाला या त्रासाची किमंत माहिती आहे, जेव्हा मुस्लिम महिलांना बँक दरोडेखोर किंवा लेटर बॉक्स म्हटले जाते, त्यांना कसे वाटत असेल."

X
COMMENT