आरोग्य / निरोगी राहण्याची सोपी पद्धत...मॉर्निंग वॉक

सकाळी वॉक केल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते

दिव्य मराठी वेब टीम

Nov 14,2019 12:15:00 AM IST

महागडी उपकरणे आणि अधिक कष्ट न घेता वजन कमी करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे मॉर्निंग वॉक. एका संशोधनानुसार आठवड्यातन ६ ते ९ मैल सकाळी चालणाऱ्या लोकांचे शरीर निरोगी राहते व ते दीर्घायुषी राहतात. तसेच ४५ मिनिटांचा वॉक ७ दिवस केल्याने २ किलो वजन कमी होते.

  • हृदयरुग्णांसाठी फायद्याचा

सकाळी वॉक केल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. दररोज ३० मिनिटांचा वॉक केला तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी राहतो. शरीरात कोलेस्ट्रेरॉलचा स्तर कमी करण्यातही यामुळे मदत मिळते.

  • महिलांमध्ये कॅन्सरचा धोका कमी होतो

महिलांच्या आरोग्यासाठी सकाळचा वॉक खूप फायद्याचा ठरतो. नियमितपणे चालणाऱ्या महिलांमध्ये कोलोन कॅन्सरचा धोका वॉक न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत ३१ टक्के कमी होतो. ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वॉक केल्याने ५० टक्क्यांपर्यंत कम होतो.

  • हेदेखील आहेत फायदे

- वॉकमुळे एन्डॉरफिन्स हार्मोन सक्रिय होत असल्याने तणाव कमी राहतो.

- डिप्रेशन दूर होण्यासोबतच याने स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.

- वॉकमुळे हाडे दुखत नाहीत.

- शरीर ऊर्जावान राहते आणि यामुळे सर्जनशीलता वाढते.

- कोणत्याही साइड इफेक्टविना शरीराला योग्य आकारात आणण्यासाठीही मदत होते.

X
COMMENT