आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय अर्थव्यवस्था मरगळीच्या टप्प्यातून बाहेर निघण्याचे संकेत : ब्लूमबर्ग अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबरमध्ये सेवा-निर्मिती क्षेत्रातील उत्पादन वाढले, व्यावसायिक उत्पादनातही वाढ
  • ब्लूमबर्गला 8 पैकी 5 निर्देशांकात अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली दिसली
  • देशातील औद्योगिक उत्पादनात दुसऱ्या महिन्यात सकारात्मक वृद्धी

​​​​नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था मरगळीच्या टप्प्यातून बाहेर पडण्याचे सुरुवातीचे संकेत मिळाले अाहेत. सर्व्हिसेज अाणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उत्पादन डिसेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात वाढले. मीडिया समूह ब्लूमबर्ग एखाद्या अर्थव्यवस्थेची कामगिरी माेजण्यासाठी अाठ हाय फ्रिक्वेन्सी निर्देशांकावर लक्ष ठेवते. यामध्ये पाच निर्देशांकावर भारताच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहिली. ही स्थिती गेल्या वर्षी अाॅगस्टच्या स्तरावर अाली अाहे. अर्थव्यवस्थेतील सुधारेसाठी हे सुरुवातीचे संकेत अशा वेळी मिळाले जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामण अागामी अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करणार अाहेत. यामध्ये त्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही घाेषणा करू शकतात. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार ३१ मार्च राेजी संपणारे अार्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशाची अर्थव्यवस्था ५% दराने वाढेल. हा गेल्या एक दशकापेक्षाही जास्त काळातील हा सर्वात कमी वेग असेल.

डिसेंबरमध्ये सेवा व निर्मितीतील उत्पादन वाढले

सेवा क्षेत्रातील उत्पादनाचा निर्देशांक डिसेंबरमध्ये पाच महिन्यात सर्वात उच्च स्तरावर राहिला. नवा कार्यादेश मिळण्याच्या वेगात सुधारणा अाल्याने क्षेत्रातील उत्पादनात तेजी येण्यास मदत मिळाली. मार्केट इंडिया सर्व्हिसेस पीएमअाय इंडेक्स डिसेंबरमध्ये ५३.३ वर पाेहाेचला. हा याअाधीचा महिना नाेव्हेंबर ५२.७ वर हाेता. या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग पीएमअाय डिसेंबरमध्ये ५२.७ नाेंदला.

अाैद्याेगिक उत्पादन ४ महिन्यांत प्रथमच नाेव्हेंबरमध्ये वाढले

अाैद्याेगिक उत्पादन चार महिन्यांत प्रथमच नाेव्हेंबरमध्ये वाढले. यामध्ये खाण, निर्मिती अाणि ऊर्जा क्षेत्राचे विशेष याेगदान राहिले. यात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ पाहायला मिळाली. काही महिन्यांतील घसरणीनंतर ग्राहक वस्तूंच्या उत्पादनात वाढ पाहावयास मिळाली. अाठ प्रमुख उद्याेग क्षेत्राच्या निर्देशांकात नाेव्हेंबरदरम्यान वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १.५% घसरण दिसली. औद्योगिक उत्पादनात घसरण झालेला हा चौथा महिना आहे.

निर्यातीमध्ये घसरणीचा कल, डिसेंबरमध्ये १.८% कमी

देशाची एकूण निर्यात अद्यापही मागे अाहे. डिसेंबरदरम्यान एक वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १.८% ची घसरण पाहायला मिळाली. याचे मुख्य कारण, अभियांत्रिकी सामग्रीच्या निर्यातीत घट येणे हे अाहे. त्याचा देशातील बिगर- अाॅल एक्सपाेर्टमध्ये एक तृतीयांश हिस्सा अाहे. भांडवली वस्तूची अायात घटली अाहे. यामध्ये डिसेंबरदरम्यान वार्षिक अाधारावर १६.५% घसरण नाेंदली अाहे. याअाध नाेव्हेंबरमध्ये यात २२% घसरण नाेंदली गेली.
 

बातम्या आणखी आहेत...