आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य नाही : भाकपचे डी. राजा यांचे मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने कलम ३७० रद्द करणे हे ‘घटनाबाह्य आणि लोकशाहीविरोधी’ पाऊल आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी रविवारी व्यक्त केले. काश्मीरमधील स्थिती सामान्य नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षांचे ११ सदस्यांचे शिष्टमंडळ शनिवारी दिल्लीहून काश्मीरला गेले होते. त्या शिष्टमंडळात राजा यांचाही समावेश होता. पण या नेत्यांना प्रशासनाने श्रीनगर विमानतळावरून पुढे जाऊच दिले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे ‘कलम ३७० रद्द करणे आणि काश्मीरची स्थिती’ या विषयावर आयोजित बैठकीत बोलताना राजा म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती मुळीच सामान्य नाही. हे लोकांना समजायला हवे. तेथे टेलिफोन सुरू नाहीत. फोन सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे, पण तसे नाही. आम्ही स्वत: त्याची खात्री केली आहे. इंटरनेटही सुरू नाही. शाळा, महाविद्यालये उघडलेली आहेत, पण विद्यार्थी तेथे जात नाहीत. पालकही मुलांना शाळांत जाऊ देण्यास तयार नाहीत. लोकांना रुग्णालयातही जाता येत नाही. काश्मीरमध्ये संचारबंदी आहे. सर्वकाही सुरळीत असेल तर मग संचारबंदी का लावण्यात आली आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

जम्मू आणि काश्मीरचे विभाजन हे भारतीय लोकशाहीच्या संघ-राज्य तत्त्वाच्या विरोधात आहे, असा आरोप राजा यांनी केला. 
 

भारतीय-पाकिस्तानी मुस्लिमांत सांस्कृतिक फरक 
पाकिस्तानी मुस्लिमांनी भारतीय मुस्लिमांना कधीही स्वीकारले नाही तसेच काश्मिरी मुस्लिमांनीही पाकिस्तानमध्ये जाण्याचा कधी विचार केला नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांच्यातील सांस्कृतिक फरक. काश्मिरी मुस्लिम हे ‘आपल्या विचारसरणीचे मुस्लिम’ आहेत या मताशी पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना हेही सहमत नव्हते, असे मतही राजा यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...