आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Smart Home Gadget Will Also Diagnose Illness, Order Medication And Alert You To Home Damage

स्मार्ट होमचे गॅजेट आजाराचे निदान, औषधाची ऑर्डर देत घराच्या नुकसानीबाबत सतर्कही करेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळचेे  सहा वाजले आणि घड्याळाची घंटा नेहमीपेक्षा लवकर खणखणू लागली. घड्याळ बिघडले नाही, उलट स्मार्ट क्लॉकने तुमच्या कार्यक्रम स्कॅन केला आहे. सकाळी तुम्हाला सादरीकरणासाठी लवकर जायचे आहे. बाथरूममधील शॉवर आपोआप सुरू होईल आणि वातावरणानुसार पाणी उपलब्ध करेल. इलेक्ट्रिक कार निघण्यासाठी तयार आहे. ती सौर पात्याद्वारे किंवा पवन ऊर्जेद्वारे चार्ज झालेली आहे. तुम्ही जेव्हा घरी आलेले असता तेव्हा ड्रोनने आलेले पाकीट तुमची वाट पाहत असते. त्यात सर्दीचे औषध आहे. बाथरूमध्ये लावलेल्या हेल्थ सेन्सर्सनी संभाव्य आजाराचा अंदाज घेत औषधाची आॅर्डर स्वत:हून दिली आहे.


दहा वर्षांनंतर येणाऱ्या स्मार्ट होमचे हे  काल्पनिक चित्र आहे. स्वीडिश रिसर्च फर्म बर्ग इनसाइटच्या म्हणण्यानुसार, सहा कोटी ३० लाख अमेरिकी घरे २०२२ पर्यंत स्मार्ट होम होतील. तज्ज्ञांनुसार, दहा वर्षांनंतर काही इंटरनेट ऑफ थिंग्ज(आयओटी)मुळे हे होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स(कृत्रिम प्रज्ञा)मुळे स्मार्ट होम मालकांच्या किंवा त्यात राहणाऱ्या लोकांच्या आवश्यक गरजा ओळखेल. रोबोटिक्सच्या नवोन्मेषात आपणास अशा मशीन्स मिळतील, ज्या स्वच्छता, कुकिंगसह अन्य घरकामे करतील. स्मार्ट होम ऑटोमेशनचा खर्च खूप जास्त असेल. एबीआय रिसर्च फर्मनुसार, आयओटी गॅजेट्सवर २०२१ पर्यंत ग्राहक सुमारे ८४६८ अब्ज रुपये खर्च करतील. इंटरनेटशी संबंधित टेलिव्हिजनशिवाय घराची निगराणी व सुरक्षा उपकरणाकडे निर्मात्यांचे लक्ष आहे. मार्केट रिसर्च कंपनी आयओटी अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, सध्या केवळ सात अब्ज आयओटी कनेक्टेड डिव्हाइस सुरू आहेत. स्मार्ट होम आपली खूप सारी माहिती जमा करतील. त्यामुळे त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची ठरते. इंटरनेटला जोडलेले प्रत्येक डिव्हाइस हॅकर्सच्या निशाण्यावर होऊ शकते.


भविष्यात स्मार्ट होममध्ये एआय प्लॅटफाॅर्म संपूर्ण घराच्या मेंदूच्या धर्तीवर काम करतील. उदाहरणार्थ आयओटी कंपनी क्रेस्ट्रॉन अशा सॉफ्टवेअरवर काम करत आहे जे एखाद्या व्यक्तीच्या सवयीची नोंद करेल. उदा. सकाळच्या वेळी कोणते संगीत एेकायला आवडते. रात्री कशी प्रकाशयोजना हवी आहे. भविष्यात स्मार्ट होममध्ये रोबोट्सची भूमिका महत्त्वाची असेल. रोबोटिक फर्निचर कंपनी ओरी लिव्हिंग आयकिया तुमच्या गरजेनुसार फर्निचरचे भाग बनवण्यावर काम करत आहे. डेस्कची गरज असेल तेव्हा बिछाना वेगळा होईल. डिझाइन-३ कंपनी स्मार्ट होम रोबो कार्ल बनवत आहे. कपड्यांनी झाकलेला रोबो दिवसभर घराजवळ फिरेल. कॅमेरा, सेन्सरद्वारे लोकांना ओळखेल. गॅससारख्या कोणत्याही नुकसानकारक गळतीवर लक्ष ठेवेल.


आरोग्यावर लक्ष ठेवणारे अॅप्लिकेशनही स्मार्ट होमचा भाग असेल. व्यक्ती सतत गोड सॉफ्ट ड्रिंक घेत असेल तर रेफ्रिजरेटरमधील कॅमेरे व सेन्सर्स पौष्टिक पर्याय सांगेल. मेडिसिन कॅबिनेट घरातील सदस्यांनी अौषध घेतले की नाही हे तपासेल. टॉयलेटमधील सेन्सर मलमूत्र स्कॅनिंगमधून आजाराचे संकेत पाहील. टोटो कंपनीने युरिनचे नमुने घेणाऱ्या टॉयलेटची चाचणी घेतली आहे. अन्य एक कंपनी आरशाच्या पेटंटच्या तयारीत आहे. त्यात त्वचेवरून आजार कळेल.
 

 

नवे तंत्रज्ञान :  टॉयलेटचे सेन्सर्सही आरोग्य पाहणार, घर उजळवतील भिंती

> स्मार्ट लॉक : चेहरा,आवाज आेळखण्याचे तंत्रज्ञान फ्रंट डोअरमध्ये असेल.
> वेदर स्टेशन: छतावर सेन्सर हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करेल.
> चार्जिंग पोर्ट: शक्तिशाली हुक अप इलेक्ट्रिक कार, ई- मोटारसायकल व अन्य वाहनांना चार्ज करेल.
> स्मार्ट शॉवर: आवाजाने नियंत्रित होईल शॉवर. प्रत्येक वेळी तापमानच्या हिशेबाने स्वत: चालेल.

> ड्रोन पॅड: घराचे छत वा लॉनवरील लँडिंग पॅडवरून ड्रोन्स सामग्रीचा पुरवठा करू शकतील.
> मॉनिटरिंग डिव्हाइस: घरातील सेन्सर्स पाण्याने होणारे नुकसान, कीटक-किड्यांवर लक्ष ठेवेल. 
> लाइट अप वॉल्स:  बल्ब लावण्याची गरज नसेल. घराच्या भिंतीच प्रकाशमान असतील. 
> हेल्थ सेन्सर: सेन्सर रहिवाशाच्या प्रकृतीची देखभाल करेल. आजाराचे लक्षण पकडेल.
> रोलेबल टीव्ही: खूप पातळ टीव्ही सेट वापरात नसल्यावर गुंडाळला जाऊ शकेल.
> थ्री-डी प्रिंटर: मायक्रोवेव्ह अोव्हन व टोस्टरसमान थ्री-डी प्रिंटर घरी असतील.
> शेप शिफ्टिंग फर्निचर: फर्निचर सूचना करताच आकार बदलेल. यामुळे लहान घरे, अपार्टमेंटमध्ये जागा वाचेल.
> टेक फ्री रूम: घरांत वायरलेस सिग्नल ब्लॉक करणारे खाेल्या असतील. डिसकनेक्टची संधी मिळेल.
 

बातम्या आणखी आहेत...