आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा : उमरगा तालुक्यातील रामपूर पाटीजवळ येळी शिवारात अज्ञात तस्कराने १४४ किलाे वजनाचे गांजाचे ६८ बंद पाकिट टाकून पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१५) उजेडात आला आहे. या गांजाची अंदाजित किंमत ९ लाख रुपये असून समोर पोलिसांचे वाहन पाहून तस्कराने आड मार्गात हा गांजा टाकून पलायन केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सदरील गांजा जप्त केला आहे. उमरगा तालुक्यातील रामपूर पाटीजवळ येळी शिवारात अज्ञात आरोपींनी पोत्यात पॅक केलेला गांजा टाकुन पसार झाला. दरम्यान शुक्रवारी सकाळी हणमंत सजगुरे हे शेताकडे गेले असता त्यांना शेतात बेवारस पाकिटे दिसून आल्याने त्यांनी याबाबत गावचे पोलिस पाटील सूर्यकांत माळी यांना दिली. पोलिस पाटील माळी यांनी पाहणी करून तत्काळ उमरगा पोलिसांना येळी शिवारात मोठ्या प्रमाणात गांजाची पाकिटे असल्याचे सांगितले.
याबाबत माहिती मिळताच उमरगा पोलिस ठाण्यातील साहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी त्यांना ६८ गांजाचे पाकीट आढळून आले. सदरील पाकिटांचे वजन केले असता १४४ किलो गांजा असल्याचे दिसून आले. ज्याची अंदाजे किंमत नऊ लाख रुपये आहे. दरम्यान, उमरगा येथील पोलिस निरीक्षक माधव गुुंडिले हे औरंगाबाद येथे कोर्टाच्या कामानिमित्त गेल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून लोहारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मोताळे यांनी हा पंचनामा केला. यावेळी उमरगा ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल कांतू राठोड, नागनाथ वाघमारे, सूरज गायकवाड, उत्कर्ष चव्हाण, चालक मेटे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.