आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये कडाक्याच्या थंडीत बर्फाचे बांधले हॉटेल, भिंती आणि फर्निचरसुद्धा बर्फाचेच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुलुन बुईर- चीनमध्ये सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे. अशा वातावरणात लाेकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स व व्यावसायिकांनी अनेक नव्या कल्पना शोधून काढल्या आहेत. चीनमधील शेनयांग शहरात अनेक जागी बर्फाची हॉटेल्स व रेस्टॉरंट उभारण्यात आली आहेत. हॉटेल्स उभारण्यासाठी ५०० बर्फाच्या विटांचा वापर करण्यात आला आहे. फरशीसुद्धा बर्फापासून तयार केली आहे. येथे ५० लाेकांना बसण्याची सुविधा आहे. हॉटेल मंगोलिया असेच बांधले आहे. या हाॅटेलमधील सर्व काही बर्फाचे आहे. 

 

स्वीडनमध्ये १९८९ पासून सुरू झाला ट्रेंड 
बर्फाचे एक हॉटेल स्वीडनमधील जॉकसजर्वी या दुर्गम गावात बांधण्यात आले आहे. या हॉटेलसाठी ३१ हजार टन बर्फ लागले. ५९२०० चौरस फूट जागेत असलेल्या या हॉटेलमध्ये ३५ खोल्या आहेत. यात साध्या खोल्यापासून लक्झरी सूट आहेत. १९८९ पासून दरवर्षी हा ट्रेंड बदलतो आहे. २९ वर्षापूर्वी ६० चौरस फुटांमध्ये इग्लू (बर्फापासून तयार घर)च्या बांधकामापासून सुरुवात झाली होती.