आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Soil That Causes Air Pollution; From That Production Of Water Purification, Oil And Medicines Was Made

ज्या मातीमुळे व्हायचे वायू प्रदूषण; त्यापासूनच करण्यात आली जलशुद्धीकरण, तेल, औषधींची निर्मिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाेज पुरोहित

जोधपूर : जोधपूर देशात हवेतील प्रदूषणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामागे येथील माती हे कारण आहे, परंतु याच मातीपासून डॉ. राकेश शर्मा यांनी जल शुद्धीकरण, जैव इंधन व आैषधींची निर्मिती केली आहे. ते १० वर्षांपासून त्यावर संशोधन करत आहेत. आतापर्यंत १२ पेटंट त्यांनी आपल्या नावे नोंदवले आहेत.

मूळचे शेखावाटीचे डॉ. शर्मा म्हणाले, माठ बनत असलेल्या मातीमध्ये बाभळीच्या शेंगा व काही रसायन मिसळले. या माठांत काही छिद्र ठेवण्यात आले. त्यातून पाणी ओरिगमी तंत्राच्या साह्याने झिरपत राहिले. पाणी झिरपत राहिल्याने फ्लोराईड, नायट्रेट, सल्फेट, एसिटेट, कॅल्शियम व मॅग्नेशियमला माती शोषून घेते.  

जैव इंधन...  

मातीच्या रासायनिक प्रक्रियेनंतर त्यात मेट नॅनो पार्टिकल टाकून मायक्रो रिएक्टर बनवले. मायक्रो थिएटरला तलावांत साठलेल्या पाण्यातील काही घटकांच्या साह्याने गरम करण्यात आले. त्यानंतर त्याचे जैव इंधनात रुपांतर झाले. मातीत एसिटाइल कोलिन असते. यातून स्मरण शक्तीवर नियंत्रित ठेवता येते. मातीत कार्बन, सिजियम, बेरिलियम मिसळण्यात आले. एसिटाइल कोलिन बनले. त्याचा वास घेतल्याने त्याचे मेंदूतील प्रमाण वाढते आणि रुग्णाला दिलासा मिळतो.

बातम्या आणखी आहेत...