आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध आईला त्रास देणाऱ्या मुलगा, सुनेला न्यायालयाचा दणका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  वृद्ध  आईचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढणाऱ्या व्यावसायिक मुलाला व सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. दैनंदिन गरजांसाठी पोटगीस्वरूपात आईला दरमहा १० हजार रुपये देण्याचे सांगत मुलाने व सुनेने इतरांमार्फत तसेच स्वतः वृद्ध  आईला त्रास न देण्याचे आदेश दिले आहेत.    


पुण्यातील मध्यवर्ती भागातील हे कुटुंब आहे. वृद्ध  महिलेला दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. वृद्ध  महिलेने स्वकष्टातून सदनिका खरेदी केली होती. पतीच्या निधनानंतर लहान मुलगा, पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने सदनिकेत राहत होती. असे असताना सुनेकडून आईला जेवायला न देणे, मुद्दाम सिलिंडरचे बटण सुरू ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, तर मुलाकडून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून सदनिका बळकावण्यासाठी त्रास देणे सुरू होते.  

 

मुलाच्या आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिस ठाण्यातही तक्रार दिली होती. तिथूनही योग्य मदत न मिळाल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून वृद्ध आईने न्यायालयात महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत दैनंदिन गरजांसाठी पोटगीची मागणी केली. वृद्धेचे वकील अॅड. योगेश पवार यांनी केलेल्या युक्तिवादानंतर वृद्ध आईला मुलाने १० हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुलाला आणि सुनेला वृद्ध आईच्या सदनिकेत जाण्यापासून मज्जाव केला आहे.

बातम्या आणखी आहेत...