आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड घाटात भरधाव ट्रकची एसटी बसला धडक; 15 प्रवासी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव : कन्नड घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. घाटात सलग दुसऱ्या दिवशी एसटी व आयशर ट्रकचा अपघात झाला. चाळीसगावकडून कन्नडकडे जाणारा भरधाव ट्रक बसवर धडकला. या अपघातामध्ये ट्रक चालकासह एसटीमधील १५ जण जखमी झाले. कन्नड घाटातील महादेव मंदिराजवळील वळणावर शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अमळनेर आगाराची पुणे-अमळनेर बस (क्रमांक एमएच.२०-बीएल.२५१८) औरंगाबादकडून चाळीसगावकडे येत होती. बसमध्ये २१ प्रवासी होते. दुपारी ३ वाजता ही बस कन्नड घाटातील महादेव मंदिराजवळील वळणावर पोहोचली. यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच.२०.डीई.७३८४) पेट्रोल टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या बसला जबर धडक दिली. या धडकेत ट्रकच्या चालकासह बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. दोन्ही वाहनांची समोरसमोर धडक झाल्याची माहिती मिळताच महामार्ग केंद्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. एएसआय दत्तू खैरनार, शामकांत सोनवणे, संदीप सपकाळे, रेहान खान, प्रकाश चव्हाण तसेच विजय जोशी यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य राबवले. बसमधील व आयशरमधील जखमींना चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. अपघातग्रस्त वाहने क्रेनद्वारे रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे

नाना वाल्मीक भवर (वय २२, रा.गंगापूर), रमेश दामोदर येवले (वय ६६, रा.औरंगाबाद), संगीता वाघ (वय ३५, रा.सिल्लोड), धोंडीराम सोनवणे (वय ४०, रा.जुनपानी), अंजनाबाई घुगे (वय ३५, रा.साखरवेल), सविता सांगळे (वय ३५, रा.निंभोरा), वर्षा सांगळे (वय ३५, रा.निंभाेरा), सुलाबाई मुंडे (वय ४०, रा.कन्नड), गणेश गायकवाड (वय ५०, रा.अंधानेर), अलिशाबी गफूर (वय ७०, रा.रांजणगाव), सबिना बी सईद (वय ४०, रा.रांजणगाव), अनिल तायडे (वय ४५, रा.चाळीसगाव), भानुदास खरात (वय ५०, रा.चाळीसगाव), विलास शिरसाट (वय ५६, रा. ठाणे), सरलाबाई सोनवणे (रा.जुनपानी, वय ३९).