आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचा चित्रपट 'गुड न्यूज' ची स्टार कास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जुंपले आहेत. याचदरम्यान अक्षय कुमारने बाकीच्या स्टार कास्टसोबत आपले मेडिकल रिपोर्ट्स सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांच्या आजारासोबत फनी ट्रीटमेंटदेखील दिल्या आहेत.
कॅरेक्टर्स केले जस्टिफाय...
या स्पेशल पोस्टर्सद्वारे चित्रपटाच्या स्टार कास्टने आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. चित्रपटात अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ, किआरा आडवाणीदेखील दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केले आहे. 'गुड न्यूज' 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
किआराला आहे गॅसचा प्रॉब्लेम...
दिलजीतची पत्नी मोनिकाची भूमिका साकारत असलेल्या किआरा आडवाणीचीही मेडिकल रिपोर्ट दाखवली गेली आहे. तिला गॅसचा प्रॉब्लेम आहे. कंडीशन एनर्जीने भरपूर सिंड्रोम सांगितलं गेला आहे. ट्रीटमेंट म्हणून तिला कमी एक्सायटेड व्हायचा सल्ला दिला गेला आहे. कारण असे करणे तिच्या नवऱ्याला घाबरवते.
दिलजीतला स्पॅम फइदा कन्फ्यूजन सिंड्रोम....
दिलजीतनेदेखील आपला मेडिकल रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्याबद्दल लिहिले गेले आहे, नाव हनी बत्रा, लक्षणे - मुलगा जिद्दीला पेटला. कंडीशन - स्पॅम फईदा कन्फ्यूजन सिंड्रोम. ट्रीटमेंट - लोकांना थोडी स्पेस द्या. (अंतराळातील नाही यार)
करीनाला बेबी फीव्हर...
करिनाच्या पात्राचे नाव चित्रपटात दीप्ति बत्रा आहे. तिला बेबी फीव्हर लक्षणे सांगितली जात आहेत. मात्र ती जबाबदारी कॉम्प्लेक्सच्या अवस्थेमध्ये आहे आणि तिला कोणत्याही डिस्टर्बन्सशिवाय जर शक्य झाले तर मेडिटेशन करण्याची ट्रीटमेंट सांगितली जात आहे.
अक्षयला सल्ला - बायकोचे म्हणणे ऐका...
चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सर्वात आधी अक्षय कुमारचा मेडिकल रिपोर्ट रिव्हील केला गेला. त्याचे नाव वरुण बत्रा आहे. वरुण गूफ अप्सने त्रस्त आहे. तो टॉप क्वालिटी बॅरियरच्या अवस्थेत दिसला. तसेच ट्रीटमेंट म्हणून त्याला नेहमी बायकोचे म्हणणे ऐकायचे सांगितले गेले आहे. जर तुमच्याकडे पर्याय असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.