आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The State Does Not Have The Authority To Repeal The CAA; Kerala Governors' Reactions, Discussions From Politics, Educational Institutions To Cinema

राज्याला सीएए रद्द करण्याचा अधिकार नाही; केरळच्या राज्यपालांची प्रतिक्रिया, राजकारण, शैक्षणिक संस्थांपासून चित्रपटसृष्टीपर्यंत चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय इतिहास काँग्रेसच्या शिफारशींवरही सवाल, बेकायदा असल्याचे मत
  • कानपूर आयआयटीत फैजच्या काव्यावरून वाद वाढला

​​​​​​​तिरुवंतपुरम : केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी माध्यमांना सांगितले की, विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधात मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव असंवैधानिक आहे. सीएएच्या विरोधात केरळ प्रस्ताव मंजूर करू शकत नाही. नागरिकत्वाचा मुद्दा केंद्र आणि संसदेच्या कक्षेत येतो. राज्य याबाबत कायदा रद्द करू शकत नाहीत. तसेही केरळमध्ये घुसखोर नाहीत.

राज्यपालांनी याआधी २९ डिसेंबर रोजी कन्नूर विद्यापीठात भारतीय इतिहास काँग्रेसच्या अधिवेशनात सीएएचे समर्थन केले होते. त्यांनी सांगितले होते की, इतिहास काँग्रेसने राज्य सरकारला अनेक शिफारशी केल्या आहेत. यात केंद्रासोबत सहकार्य न करण्याचा समावेश आहे. अशा शिफारशी बेकायदेशीर आणि गुन्हेगारीच्या श्रेणीत येतात. त्यानंतर इतिहासकार इरफान हबीब यांनी त्यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ३१ डिसेंबर रोजी सीएएविरोधात प्रस्ताव मंजूर करणारे पहिले राज्य झाले आहे.

हिंदूविरोधी असल्याची चौकशी होणार नाही : उपसंचालक

कानपूर आयआयटीचे उप संचालक मणींद्र अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की, शायर फैज अहमद फैज यांचे काव्य 'हम देखेंगे' हिंदू विरोधी असल्याची चौकशी केली जात नाहीये. आरोप चुकीचे आहेत. गेल्या १७ डिसेंबरला संस्थेत विद्यार्थ्यांच्या रॅलीनंतर तक्रारी आल्या होत्या. केवळ तक्रारींची चौकशी करण्यात येत आहे. रॅलीत फैज यांची कविता ऐकवल्याने लोकांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फैज यांना हिंदूविरोधी म्हणणे चुकीचे : जावेद अख्तर

चित्रपट गीतकार आणि शायर जावेत अख्तर यांनी सांगितले की, फैज यांची एखादी गोष्ट किंवा त्यांच्या काव्याला हिंदू विरोधी म्हणने चुकीचे आहे. फैज यांनी 'हम देखेंगे' हे काव्य पाकिस्तानमध्ये जिया उल हक यांच्या सरकारविरोधात लिहिले होते. त्यांनी अर्धे आयुष्य देशाबाहेर घालवले आहे. ते पाकिस्तान विरोधी असल्याचे पाक सरकारचे म्हणने होते. आता त्यांना भारत विरोधी म्हटले जात आहे.

सीएएला विरोध केल्याने अटकेतील १४ महिन्यांच्या मुलीच्या आईला जामीन

वाराणसी : उत्तर प्रदेशात नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात अटक झालेल्या पर्यावरण कार्यकर्ता एकता शेखर यांना १४ दिवसांनी गुरुवारी जामीन मिळाला. सुटका होताच एकता महमूरगंज येथील घरी जात १४ महिन्याच्या मुलीची भेट घेतली. एकताने सांगितले की, ५ दिवस मला कोणत्याच नातेवाईकाला भेटू दिले नाही. कारागृह अधिकारी वरुन दबाव असल्याचे सांगत होते.

प्रजासत्ताक दिवस : चित्ररथ नाकारला, सीएएविरोधामुळे भेदभाव : तृणमूलचा आरोप

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी सांगितले की, सीएए विरोधामुळे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठीची पश्चिम बंगालचा चित्ररथ केंद्र सरकारने नाकारला आहे. हे भेदभावपूर्ण आहे. तर संरक्षण मंत्रालयाने बुधवारी म्हटले होते की, बंगालच्या चित्ररथाचा प्रस्ताव तज्ञ समितीकडे दोनदा पाठवण्यात आला होता. दुसऱ्या बैठकीत चर्चेनंतर तो नाकारण्यात आला.

६ वर्षांपुर्वी मृत व्यक्तीला नोटीस: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात शांतता भंग होण्याच्या शक्यतेने यूपीतील फिरोजाबाद पोलिसांनी २०० लोकांना नोटीस पाठवल्या आहेत. यात एक नोटीस ६ वर्षांपुर्वी मृत बन्ने खान यांना बजावण्यात आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...