आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमधील १५० पेक्षा जास्त मुलांचे मृत्यू प्रकरण ; केंद्रासह राज्य सरकारने सात दिवसांमध्ये खुलासा सादर करावा - सर्वाेच्च न्यायालय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बिहारमध्ये विशेषत: मुझफ्फरपूर येथे चमकी तापामुळे (अॅक्यूट इन्सिफ्लायटिस सिंड्राेम- एईएस) आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त मुलांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने साेमवारी केंद्र व राज्य सरकारकडून खुलासा मागितला. त्यानुसार दाेन्ही सरकारांना आगामी सात दिवसांत खुलासा सादर करून त्यात बिहारमध्ये चमकी तापाचा प्रसार राेखण्यासाठी व हा आजार झालेल्यांना दिलासा देण्यासाठी काय पावले उचलली, हे सांगावे लागणार आहे. तसेच गत तीन वर्षांत उत्तर प्रदेशात अशा प्रकारच्या आजारामुळे अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या माहितीवरून राज्य सरकारलाही न्यायालयाने नाेटीस बजावून याबाबत उत्तर मागितले आहे. 

 

याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील मनाेहर प्रताप व सनप्रीत सिंह यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले की, बिहार व उत्तर प्रदेशात चमकी तापामुळे दीडशेहून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. असे असूनही राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही. हा आजार राेखण्यासह रुग्णांवर उपचार करण्यात राज्य व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यावर राज्यात आता या आजाराची स्थिती नियंत्रणात असून, सरकारने यासाठी आवश्यक पावले उचलली असल्याचे बिहार सरकारकडून अतिरिक्त साॅलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी यांनी सांगितले. त्यावर एखाद्या आजारामुळे इतक्या माेठ्या संख्येने मुलांचा मृत्यू हाेणे, हा गंभीर प्रकार आहे. मुलांना अशा प्रकारे मृत्यूच्या दाढेत जाऊ देणे याेग्य नसल्याचे सांगून न्यायमूर्ती खन्ना यांनी राज्यासह केंद्र सरकारला याप्रकरणी समाधानकारक उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. 

 

केंद्र व नितीश सरकार एईएसचा प्रसार रोखण्यात अपयशी : भाकप 
पाटणा - भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) या आजारामुळे मुलांचे हाेणारे मृत्यू राेखण्यात केंद्र व राज्यातील नितीशकुमारांचे सरकार अपयशी ठरल्याचा आराेप केला आहे. तसेच हा आजार झालेल्या मुलांवर तत्काळ याेग्य ते उपचार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक स्तरावर याेजना तयार करण्याची मागणीही साेमवारी केली. भाकपचे राज्यसभा सदस्य व पक्षाचे राष्ट्रीय सचिव बिनाॅय विश्वम यांनी मुझफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालयात जाऊन एईएसने ग्रस्त मुले व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारने काेणतीही तत्परता दाखवली नाही. त्यामुळेच मरण पावणाऱ्यांची संख्या वाढली. हा आजार राेखला जाऊ शकत हाेता; परंतु दाेन्ही सरकारांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, असेही विश्वम म्हणाले.