आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 30 हजार परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार राज्य सरकार, दोन वर्षांत पूर्ण होईल बांधकाम

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत 30 हजार स्वस्त घरे बांधणार ठाकरे सरकार, जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषदेत माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी दिली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये माहिती देताना हे काम येत्या 2 वर्षांमध्ये केले जाणार असल्याचे ते पुढे म्हणाले. त्या 1 मे पासून स्वस्त घरांची ही योजना लागू केली जाणार आहे. या घरांपैकी काही घरे राज्यातील पोलिस कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

विधान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "1 मार्चपासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुंबईत 30 हजार परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. येत्या 2 वर्षांमध्ये याचे कामकाज पूर्ण होईल. सोबतच, त्यापैकी 10 टक्के घरे महाराष्ट्र पोलिस कर्मचारी आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवली जाणार आहेत. या घरांचे बांधकाम महाराष्ट्र हाउसिंग अँड एरिआ डेव्हलपमेंट ऑथोरिटीतर्फे केले जाईल. एसईझेडकडून अधिग्रहण केलेल्या परंतु, वापरात नसलेल्या जमिनीपैकी 25 हजार एकर जमीन या घरांसाठी वापरली जाईल. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मोबदला सुद्धा दिला जाईल." राज्याचे अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होत आहे.