आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात विचित्र Couple: 2 फुटांच्या पतीसोबत राहते ही महिला; सेक्शुअल लाइफवर दिले असे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - मिंडी आणि तिच्या पतीची लोक नेहमीच सोशल मीडियावर टिंगल करतात. तिच्या पतीची उंची फक्त 2 फुट 8 इंच इतकी आहे. अनेकांना प्रश्न पडतो की या अजब जोडप्याची सेक्शुअल लाइफ कशी असेल. परंतु, मिंडीने प्रत्येक प्रश्नाचे लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या पतीसोबत सेक्शुअल लाइफ खूप चांगली असून दोघेही एकमेकांसोबत खुश आहोत असे मिंडी सांगते. या दोघांची भेट 9 वर्षांपूर्वी झाली होती. यानंतर त्यांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. 


अशी झाली दोघांची भेट...
- अमेरिकेतील शिकागो येथे राहणारी मिंडी आणि सीन गेल्या अनेक वर्षांपासून सोबत राहतात. सीन एक मोटिवेशनल स्पीकर होता. जन्मापासूनच बोन डिसऑर्डरमुळे सीनचे शरीर पूर्णपणे विकसित होऊ शकले नाही. तो लोकांना प्रेम भावनेविषयी प्रेरित करत होता. एका बारमध्ये सीन आणि मिंडी यांच्या एका मित्राने दोघांची भेट करून दिली. मिंडी सीनच्या स्पीचने प्रेरित झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री जुळली. 
- सीनचे व्यक्तित्व मिंडीला खूप आवडले. यानंतर रोज दोघांच्या भेटी सुरू झाल्या. हळू-हळू मैत्री प्रेमात बदलली. सीनच्या उंचीवर मिंडीने आजपर्यंत कधीही तक्रार केली नाही. दोघांनी 2012 मध्ये विवाह केला. प्रेमात प्रेमाशिवाय सर्व गोष्टी गौन असतात असे या जोडप्याकडे पाहून लक्षात येते.


इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असतो हा कपल
सीनने सांगितले, की एकही दिवस असा जात नाही जेव्हा त्याने मिंडीला हजारवेळा आय लव्ह यू म्हटले नसेल. मिंडीची हाइट 4 फुट 11 इंच आहे. ती देखील आता सीनसोबत मोटिवेशनल स्पीकर बनली आहे. आयुष्यात प्रेमाला किती महत्व आहे आणि माणसाने कधीच प्रयत्न थांबवू नये असे सल्ले ती लोकांना देते. इंटरनेटवर लोकप्रीय असलेल्या या कपलचे अनेक जण कौतुक करतात. परंतु, काही वेळा लोकांच्या टीकेलाही समारे जावे लागते. काहींनी तर मिंडीला सीन तुला कधीच शरीरसुख देऊ शकणार नाही अशा टीका केल्या. परंतु, मिंडी आणि सीनने त्या सर्वांना हसतमुखाने उत्तरे दिली. प्रत्यक्षात, आपला पती सीन जगातील सर्वात मादक पुरुष आहे असे ती म्हणते. आपले सेक्शुअल लाइफ माणसांप्रमाणेच सामान्य असून दोघेही खूप खुश आहोत असे मिंडी सांगते.

बातम्या आणखी आहेत...