• story of Atharva winning the Under 19 World Cup

जिद्द / अंडर-19 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या अथर्वची कहाणी; लहानपणीच पित्याचे छत्र हरपले, कंडक्टरची नोकरी करत आईने सावरले कुटुंब

9 वर्षांपूर्वी एका सराव सामन्यात अथर्व अंकोलेकरने मास्टर-ब्लास्टर सचिनला केले होते आऊट

वृत्तसंस्था

Sep 17,2019 02:07:40 PM IST

विनोद यादव | मुंबई
भारतीय अंडर-१९ संघाने शनिवारी अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशला ५ गडी राखून पराभूत करत सातव्यांदा हा किताब पटकावला. यात अथर्व अंकोलेकरने घेतलेले ५ बळी विजयातील प्रमुख वैशिष्ट्य ठरले.


फिरकी गोलंदाज असलेल्या अथर्वने अंडर-१९ संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला अथर्व अत्यंत प्रभावी गोलंदाजी करतो. त्याची आई मुंबईत बेस्टमध्ये कंडक्टर आहे. आईच्या पगारावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अथर्वचे वडील विनोद यांचे ९ वर्षांपूर्वी २०१० मध्ये निधन झाले होते. पित्याचे छत्र हरपल्यानंतर आई वैदेहीने अथर्वचे पालनपोषण केले. प्रारंभी आई मुलांची शिकवणी घेऊन घर चालवत होती. मात्र, नंतर पतीच्या जागेवर मुंबईत बेस्टमध्ये तिला नोकरी मिळाली. गेल्या महिन्यात अथर्वची भारतीय संघात निवड झाली तेव्हा त्याच्या आईचे अभिनंदन करणारे सुमारे ४० हजार मेसेज आले होते.


१८ वर्षीय अथर्व मुंबईतील रिझवी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ९ वर्षांपूर्वी अथर्व प्रचंड चर्चेत आला होता. त्याचे कारण म्हणजे एका सराव सामन्यात त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद केले होते. त्याने भारताच्या अंडर-१९ संघाकडून आतापर्यंत ७ सामने खेळले असून १५ बळी मिळवले आहेत. अंडर-१९ आशिया कप तयाच्यासाठी अत्यंत यशदायी ठरला. काही दिवसांपूर्वी त्याने सांगितले होते की, लहानपणी वडील भेट द्यायची म्हणून त्याच्यासाठी बॅट घेऊन येत असत. नंतरच्या काळात क्रिकेटचे इतर साहित्यही त्यांनी आणून दिले होते. शनिवारच्या सामन्यात गोलंदाजांच्या कामिगरीमुळे टीम इंडियाने १०६ धावांचे बांगलादेशला दिलेले आव्हान टिकवत ५ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर एकही बांगलादेशी फलंदाज टिकाव धरू शकला नाही. एकामागे एक ते तंबूत परतले. अथर्वने या सामन्यात ८ षटके टाकली. यातील दोन निर्धाव होती. तयाने २८ धावा देत पाच बळी मिळवले. त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला.

X
COMMENT