आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#LionMama: मुलीवर होत होता गँगरेप, कळताच हातात चाकू घेऊन 2 मैल धावली आई; मग जे केले साऱ्या जगातून होतेय कौतुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण आफ्रिकेतील एका आईला सिंहीण असे संबोधले जात आहे. ट्विटर आणि फेसबूकवर #LionMama या नावाने तिची स्टोरी शेअर केली जात आहे. एक सामान्य आई आपल्या मुला-मुलींच्या संरक्षणासाठी रौद्र रूप धारण करून कशा प्रकारे खरी-खुरी सिंहीण बनली हे त्या दिवशी घडलेल्या घटनेतून समोर आले. काही दिवसांपूर्वीच तीन नराधम तिच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडत होते. मुलीला वाचवण्यासाठी ती दोन मैल धावली आणि यानंतर जे घडले ते जाणून आपणही या आईला दाद द्याल... 


त्या दिवशी नेमके काय घडले?
दक्षिण आफ्रिकेतील झ्वार्टवॉटर गावात राहणारी 57 वर्षांची आई दैनंदिन स्वयंपाक करत होती. त्याचवेळी अचानक तिच्या मुलीची मैत्री घरात धावत आली. आपल्या श्वासांना धीर देत आणि कपाळाचे घाम पुसून तिने त्या महिलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. घरी येत असताना काही युवकांनी अचानक त्या महिलेच्या 27 वर्षीय मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला उचलून नेले. एका रिकाम्या आणि निर्मनुष्य घरात तिचे कपडे फाडले. तेवढ्यात मैत्रीण कशी-बशी तावडीतून सुटली. पण, ते नराधम त्या मुलीच्या शरीराचे लचके तोडत होते. मैत्रिणीने सांगितलेले घटनास्थळ महिलेच्या घरापासून 2 मैल दूर होते. तरीही तिने दुसरा काहीच विचार न करता चाकू उचलला आणि पळत सुटली.


3 नराधम करत होते गँगरेप...
आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती महिला घटनास्थळी पोहोचली. आतून मुलीचे किंचाळणे ऐकूण आईचे हृदय पिळवटले. दार आतून बंद होते तरीही सिंहीण बनलेल्या या आईने दार तोडून आत प्रवेश केला. तीन नराधम तिच्या मुलीवर बलात्कार करत होते. पाहताक्षणी तिने झॅमील सियेके नावाच्या नराधमावर चाकूने सपासप वार केले. इतर दोघांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती दोघांनाही पुरून उरली. यानंतर तिने झोलिसा आणि मन्सेदिसी या दोघांना भोसकले. प्रहार इतके घातक होते की ते उठूच शकले नाही. पोलिस आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी अवस्थेत पोलिस आणि डॉक्टरांना दयेची भीक मागत होते. त्यांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले.


आईलाच झाली अटक तेव्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले...
सिंहीणने आपल्या मुलीची अब्रू वाचवली. परंतु, कायद्यानुसार तिने खून केल्या प्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. गतवर्षी घडलेल्या या घटनेनंतर तिच्यावर एक खून आणि दोन हाफ मर्डरचे आरोप लागले. या धाडसी आईला अटक झाल्याचे वृत्त समोर येताच हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. वर्षभर या महिलेच्या सुटकेसाठी कॅम्पेन सुरू झाले. तिची सुटका करण्यासाठी आणि कायदेशीर लढा उभारण्यासाठी 10 लाख रुपये गोळा करण्यात आले. त्याच दरम्यान एका प्रतिष्ठित वकिलाने तिचा खटला मोफत लढला आणि अख्ख्या देशाने एकत्रित येऊन या सिंहीणची सुटका केली.


काय म्हणाले न्यायाधीश...
सिंहीणने केलेल्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आणि दोघे गंभीर जखमी होऊन जिवंत वाचले. न्यायाधीशांना निकाल वाचताना, त्या आईने या तिन्ही नराधमांना धडा शिकवला असे म्हटले. सोबतच, तिच्या उपकारामुळेच उर्वरीत दोघांना फाशी नाही तर फक्त जन्मठेप दिली जात आहे असे म्हटले. आईने त्यांच्यावर हल्ला केला नसता तर त्या नराधमांना फाशी झाली असती. त्या दोघांनाही कोर्टाने प्रत्येकी 30-30 वर्षांची कैद सुनावली. न्यायालयाच्या या निकालावर मायलेकीने समाधान व्यक्त केले. तसेच सिंहीण आता राष्ट्रीय पातळीवर बलात्कार आणि महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात मोहिम राबवत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...