आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीच्या छाप्यातून चर्चेत आलेल्या नरेश गाेयल यांची कहाणी, सहारा खरेदी केल्यानंतर संकटाला सुरुवात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेश गोयल : ट्रॅव्हल एजंटपासून एव्हिएशन किंग, आता अटकेची वेळ
  • सहारा खरेदी केल्यानंतर संकटाला सुरुवात

दिल्ली - बंद पडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गाेयल अंमलबजावणी संचालनालया(र्इडी)च्या कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ईडी त्यांच्या विदेशातील नोंदणीकृत पाच कंपन्यांसह १९ खासगी कंपन्यांत संशयित व्यवहारांची चौकशी करत आहे. गोयलवर याआधी फेमाअंतर्गत छापे टाकले आहेत. जेट एअरवेज बंद होण्याआधी गोयल भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रातील सम्राट संबोधले जात. पंजाबच्या संगूरमध्ये जन्मलेल्या नरेश यांचे वडील सराफ व्यापारी होते. ११ व्या वर्षी नरेश यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घर कर्जात बुडाले. १९६७ मध्ये बी.कॉम.नंतर नरेश यांनी आपल्या मामाच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ३०० रु. महिना वेतनावर काम करणे सुरू केले. त्यांनी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये पाय पसरणे सुरू केले. यादरम्यान त्यांना हवाई वाहतूक क्षेत्रात तिकीट व्यवस्थेपासून भाड्याने विमान घेण्यापर्यंत समज आली आणि प्रगती साधली.
 

कंपनी सुरू करताच वादाचे सावट


जेटच्या सुरुवातीच्या निधी स्रोतावर प्रश्न उपस्थित झाले. यानंतरही जेटचा प्रवास असा सुरू राहिला की ती नंबर वन ठरली. तेव्हा गोयल यांनी २००७ मध्ये एअर सहाराला १,४५० कोटींत खरेदी केले. यानंतर कंपनीला वित्तीय अडचणींतून दिलासा मिळू शकला नाही.
 

सहारा खरेदी केल्यानंतर संकटाला सुरुवात


2008 : १,९०० स्टाफची कपात केली. सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर पुन्हा नोकरीवर ठेवले. 
2012 : जेट देशांतर्गत बाजारातील भागीदारीत इंडिगोच्या मागे राहिली.
2013 : एतिहाद एअरलाइन्सने २४% हिस्सेदारी खरेदी केली.
2018 : वैमानिकांना थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिले
2019 : जानेवारीत जेटने बँकांचे ईएमआय भरले नाहीत. कंपनीचे मानांकन घसरले.
2019 : बँकांचे ८ हजार कोटी न फेडल्यामुळे २५ मार्चला गोयलना जेट एअरवेजच्या मंडळातून राजीनामा द्यावा लागला.
2019 : १४ एप्रिलला एअरलाइनचे कामकाज बंद केले.