Home | International | Other Country | The Story of Santiago Flight 513 Which Flyed in 1954, Landed in 1989 Rare Video

35 वर्षांपूर्वी अचानक गायब झाले होते विमान, सापडल्यावर हादरून गेले लोक, दिसले 92 मानवी सापळे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 10:45 AM IST

जर्मनीत 92 जणांना घेऊन उडणारे एक विमान गायब झाले आणि 35 वर्षांनंतर अचानक ब्राझीलच्या जमिनीवर उतरले.

 • The Story of Santiago Flight 513 Which Flyed in 1954, Landed in 1989 Rare Video
  (ही कहाणी 'कॉन्ट्रोव्हर्शियल क्लेम' सिरीज अंतर्गत आहे. जगभरात वेळोवेळी असे अनेक वादग्रस्त दावे करण्यात आले आहेत, जे माध्यमांमध्ये झळकले आहेत)

  जर्मनी - जर्मनीत 92 जणांना घेऊन उडणारे एक विमान गायब झाले आणि 35 वर्षांनंतर अचानक ब्राझीलच्या जमिनीवर उतरले. जगभरातील वृत्तपत्रे बातमी देतात. लोकांच्या मनात सर्वात मोठा हाच प्रश्न असतो की, तब्बल 35 वर्षे हे विमान होते कुठे? टाइम ट्रॅव्हलवर विश्वास ठेवणाऱ्यांनी तर असाही दावा केला की, हे विमान वेळ-काळ ओलांडून पुढे गेले होते, यादरम्यान पृथ्वीवर 35 वर्षे उलटली. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत भुताटकी म्हटल्या जाणाऱ्या सेंटिगोच्या फ्लाइट 513 ची कहाणी.

  ही कहाणी अशी सुरू झाली...
  - वास्तविक, 14 नोव्हेंबर 1989 रोजी जर्मनीच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या रिपोर्टरने वृत्त छापले की, ब्राझीलमध्ये 1950 चे एक विमान लँड झाले आहे, ज्यात 92 जणांचे सापळे आहेत. पुढे दावा करण्यात आला की, हे तेच विमान आहे जे अचानक गायब झाले होते.

  - वृत्तात सांगण्यात आले की, विमानाने 35 वर्षांपूर्वी ऐचन, फ्रान्सकडे झेप घेतली होती आणि वाटेत गायब झाले होते. या विमानात 88 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर स्वार होते. उड्डाणाच्या काही वेळानंतर विमानाचा अटलांटिक समुद्रावरून जाताना संपर्क तुटला होता.


  जेव्हा अचानक लँड झाले विमान
  - वृत्तपत्रानुसार, विमानाने उतरण्याआधी ना एअर ट्रॅफिक कंट्रोलला परवानगी मागितली, ना एटीसीला विमानाच्या लँडिंगची माहिती मिळाली. यानंतर संशयामुळे एअरपोर्ट सिक्युरिटी टीम विमानआपर्यंत पोहोचली.

  विमानात होते मानवी सापळे
  - जेव्हा सिक्युरटी टीम विमानात दाखल झाली तेव्हा सर्वांना कापरे भरले. पूर्ण विमानात मानवी सापळे होते. प्रत्येक सापळा आपल्या सीटवर होता. एवढेच काय विमानाचा कॅप्टन मिगुल विक्टर क्यूरीचा सापळासुद्धा पायलेट कंट्रोल्सला पकडलेल्या अवस्थेत होता. आणि विमानाचे इंजिन सुरू होते. दहशतीत सिक्युरिटी स्टाफ विमानातून उतरले आणि ब्राझील सरकारला ही माहिती कळवली.


  काय आहे या कहाणीचे सत्य?
  - जर्मनीच्या वृत्तपत्रात छापून आलेले हे वृत्त एकदम चुकीचे आहे. हे खोटे वृत्त ईरविन फिशर नावाच्या रिपोर्टरने छापले होते. या खोट्या वृत्ताची चौकशी न करताच त्या काळातील जगातील अनेक वृत्तपत्रांनी ते छापले. ज्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली. काही जण या विमानाला भुताटकी म्हणू लागले, तर काहींनी हे टाइम ट्रॅव्हलच्या माध्यमातून शक्य असल्याचे सांगितले. टाइम ट्रॅव्हल मानणारे म्हणाले की, विमान वेळेच्या भोवऱ्यात फसले होते. परंतु, खरे म्हणजे असे कुठलेच विमान सापडलेले नव्हते. एका खोट्या बातमीचा हा परिणाम होता.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व Video

 • The Story of Santiago Flight 513 Which Flyed in 1954, Landed in 1989 Rare Video
 • The Story of Santiago Flight 513 Which Flyed in 1954, Landed in 1989 Rare Video

Trending