Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | The story of the pastor, the story of the atheist man, story for sharing, story for kids, story with learning, story with moral

एका नास्तिकाने पादरीला जाऊन विचारले - धर्म ग्रंथात दारु पिणे पाप आहे असे का म्हणतात, पादरीने त्या व्यक्तीला 3 प्रश्न विचारले आणि त्याला आपल्या चुकीची जाणिव झाली, कोणते होते ते 3 प्रश्न?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:00 AM IST

जर तुम्ही कुणाचा अपमान केला तर आयुष्यात तुम्हाला कुणाकडूनही सन्मान मिळणार नाही

 • The story of the pastor, the story of the atheist man, story for sharing, story for kids, story with learning, story with moral

  रिलिजन डेस्क. एका शहरात एक नास्तिक व्यक्ती राहत होती. तो धर्म ग्रंथांची खिल्ली उडवायचा. एकदा ती व्यक्ती एका पादरीजवळ गेली. पादरीला चुकीचे ठरवण्याचा त्याचा उद्देश होता. त्याने पादरीला विचारले की, जर मी खजूर खाल्ले तर मला पाप लागेल? पादरी म्हणाले - नाही!


  मग त्या व्यक्तीने विचारले - जर मी खजूरसोबत थोडे पाणी मिसळले तर मला पाप लागेल? पादरीने पुन्हा नकारार्थी उत्तर दिले. मग या व्यक्तीने प्रश्न केला की, जर मी ते खजूरचे पाणी आंबवले (यीस्ट मिसळले) तर हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे ठरेल?


  पादरीला त्याचा उद्देश समजला आणि त्यांनी सहज उत्तर दिले की, - अजिबात नाही. यानंतर ती व्यक्ती म्हणाली की, मग धर्मग्रंथात दारु पिणे पाप आहे असे का बोलले जाते, दारु तर या तिन्हीच्या मिश्रणाने तयार होते. ही व्यक्ती नास्तिक असल्याचे पादरीला कळाले.


  यावेळी आता पादरीने त्या व्यक्तीला प्रश्न केला की - जर मी तुझ्यावर मुठभर धूळ फेकली तर तुला इजा होईल? ती व्यक्ती म्हणाली - नाही. पादरीने पुन्हा विचारले - जर मी धूळीत थोडे पाणी मिसळून फेकले तर तुला इजा होईल? त्या व्यक्तीने मान डोलवत नकारार्थी उत्तर दिले.

  यानंतर पादरीने विचारले की - जर मी त्या मातीच्या पाण्यात काही दगड मिसळून तुमच्यावर फेकले तर काय होईल?

  इजा होईल की नाही. हा प्रश्न ऐकून तो थोडा घाबरला. त्याने विचार करुन उत्तर दिले की - तुम्ही ईजा होण्याचे बोलताय, पण यामुळे तर माझे डोके फुटेल.
  पादरी म्हणाले - तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल यावर माझा विश्वास आहे. पादरींचे बोलणे ऐकून ती व्यक्ती लाजिरवाणी झाली. त्याने आपल्या वागण्याची माफी मागितली आणि यानंतर अशी चुक न करण्याचे वचन दिले.

  लाइफ मॅनेजमेंट
  जर आयुष्यात तुम्ही कुणाचा अपमान केला तर तुम्ही तो सन्मान कधीच मिळवू शकत नाही. यामुळे व्यक्ती लहान असो किंवा मोठा सर्वांचा सन्मान करा.

Trending