एक मुलगा जंगताल फिरत होता, त्याने बघितले की राजकुमार आणि मंत्र्याच्या मुलाने हरिणची शिकारी केली, शिकारबाबत दोघांत वाद निर्माण झाला असता राजाकडे गेले प्रकरण, तेथे साक्षीदार म्हणून त्या मुलाला बोलविण्यात आले

दिव्य मराठी वेब टीम

Apr 14,2019 04:17:00 PM IST


रिलिजन डेस्क। एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याचा मुलगाही त्याला कामात मदत करत असे. एक दिवस व्यापाऱ्याचा मुलगा काही कामासाठी जंगलात फिरत होता. तिथे त्याला एक संत भेटले. बोलता बोलता संतांनी सांगितले की मी कामाच्या गोष्टी विकतो, ज्या लोकांना अडचणीतून वाचवतात. मुलाने संतांना काही पैसे दिले आणि म्हणाला की मलाही तुमच्याकडून कामाची गोष्ट विकत घ्यायची आहे. त्यावर संत म्हणाले - जर दोन व्यक्तींच्या भांडणातून सुरक्षित बाहेर पडायचे असेल तर मध्येच तिसरी एखादी गोष्ट काढायची. काही दिवस असेच निघून गेले.


एक दिवस व्यापाऱ्याचा मुलगा जंगलात फिरत असताना त्याने पाहिले की, शिकार करण्यासाठी आलेल्या मंत्र्याच्या मुलाने हरणाला बाण मारला आणि ते हरिण बाजूला जाऊन पडले. तेव्हा तिथे राजकुमार आला आणि त्याने बाणाने त्या हरणाला मारून टाकले. शिकारीवर कोणाचा अधिकार आहे या गोष्टीवरून राजकुमार आणि मंत्र्याच्या मुलामध्ये वाद सुरू झाला.


दोघांनी निर्णय घेतला की राजाच्या दरबारातच सत्य काय ते ठरवले जाईल. साक्षीदार म्हणून त्यांनी व्यापाऱ्याच्या मुलाला सोबत नेले. मंत्री आणि राजकुमाराचे म्हणने ऐकल्यानंतर राजाने व्यापाऱ्याच्या मुलाल विचारले असता त्याला साधूने सांगितलेली गोष्ट आठवली. त्याने विचार केला की, जर आपण राजकुमारांच्या विरूध्द काही बोललो तर त्यांच्यासोबत वैर निर्माण होईल आणि जर मंत्र्याच्या मुलाविरोधात साक्ष दिली तरी तो याचा सुड घेतल्याशिवाय राहणार नाही. यावर त्याने विचार करून म्हटले की, खरं तर मीच त्या हरिणाला दगड मारला होता. त्यामुळे ते हरिण झुडपात जाऊन पडले आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे बोलणे ऐकून मंत्र्याचा मुलगा आणि राजकुमार म्हणाले- हा खोट बोलत आहे याला येथून बाहेर काढा. असे करून व्यापाऱ्याचा मुलगा कसातरी त्या अडचणीतून बाहेर निघाला आणि त्याने मनोमन संतांचे आभार मानले.


लाइफ मॅनेजमेंट
बऱ्याच वेळेस आपण कारण नसताना दोन लोकांच्या भांडणात अडकतो. अशा प्रसंगात आपल्याकडे त्यातून निघण्याचा मार्ग नसतो. आपण कोणाचीही बाजू घेऊन बोलू शकत नाही. अशी स्थिती आपल्यासाठी चिंताजनक असते. यासाठी आपण अशा अडचणी निर्माण होऊ देऊ नये.

X
COMMENT