Home | Khabrein Jara Hat Ke | The strange story of Bihar's toilets

हवा-हवाई टॉयलेट : बिहारच्या अजब शौचालयाची गजब कहाणी, शिडी लावून जावे लागते शौचालयात

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 18, 2019, 11:15 AM IST

एक लाख रुपये कर्ज घेऊन शौचालय बांधले

  • The strange story of Bihar's  toilets

    बेगुसराय - हे छायाचित्र बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील आहे. येथे लोकांना १८ फूट उंचावरील स्वच्छतागृहात शिडी लावून जावे लागते. येथील बछवाडा ब्लॉकमधील रानी गावात बांधण्यात आलेले शौचालय चमचम देवी व मीनादेवी यांचे आहे. या महिलांनी एक लाख रुपये कर्ज घेऊन शौचालय बांधले. तेथे शौचालय बांधण्यासाठी असलेल्या जमिनीवर एक मोठा खड्डा होता. गावाला हागणदारीमुक्त जाहीर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी महिलांना म्हटले, शौचालय खड्ड्यात बांधून घ्या. नंतर मनरेगा योजनेतंर्गत तो खड्डा आम्ही भरून काढतो. तीन कुटुंबातील लोक मुख्यालयात चकरा मारून थकले. पण खड्डाही भरला नाही आणि शौचालय बांधण्यासाठी खर्च झालेली रक्कम देण्यात आलेली नाही. पुरुषांना मात्र शिडीवरून शौचालयात जाणे भाग पडत आहे.

Trending