आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Submarine Discovered Two Missing Vessels 140 Years Ago, A Search That Began For Ten Years

पाणबुड्यांनी १४० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दोन जहाजे शोधली, दहा वर्षांपासून सुरू होता शोध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लान्सिंग - अमेरिकेतील मिशिगनच्या उत्तरेकडील समुद्रात १४० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दोन जहाजे शोधून काढण्यात यश मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या जहाजांचा शोध सुरू होता, अशी माहिती पाणबुडे व समुद्राचे इतिहासकार बर्नी हेलस्ट्रॉम यांनी दिली.  ते म्हणाले, दोन्ही जहाजे २०० फूट खोल अंतरावर सापडली. ती पूर्णत: खराब झालेली आहेत. याचा केवळ सांगाडा उरला आहे. ही जहाजे १८७८ मध्ये बेपत्ता झालेली आहेत. यांची नावे पेशेटिगो व सेंट अँड्रयूज अशी आहेत. यात कॅप्टनसह दोन-दोन क्रू मेंबर्स होते. हेलस्ट्रॉम यांनी सांगितले, जहाज शोधण्यासाठी अनेक पाणबुड्यांची मदत लागली.
 

कोळसा वाहून नेत होती जहाजे
बर्नी हेलस्ट्रॉम यांनी सांगितले, पेशेटिगो १६१ फूट लांब व सेंट अँड्रूयूज १४३ फूट लांब होता. याचा वापर कोळसा वाहून नेण्यासाठी केला जात होता. पाषणाला धडकल्यानंतर दोन्ही जहाजे बुडाल्याचे सांगण्यात येते. 
 

बातम्या आणखी आहेत...