आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Sugarcane Factory Of Pandharpur Has Taken Out Loans Of Millions In The Name Of The Farmers

पंढरपूरच्या कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले लाखोंचे कर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर लाखोंचे कर्ज उचलल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांनी बँकेची कारवाईबाबत नोटीस आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बँक व कारखान्याशी काहीएक संबंध नसताना आपल्या नावे कर्ज उचलले गेल्याने या शेतकऱ्यांनी गुरुवारी कारखान्यावर जाऊन याबाबत विचारणा केली.

पंढरपूरचे आमदार भारत भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याबाबत मागील अनेक महिन्यांपासून तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच थेट १५० किमी उस्मानाबाद जिल्ह्यातील पन्हाळवाडी, बावी (ता. भूम) येथील अनेक शेतकऱ्यांच्या नावे परस्पर लाखोंचे कर्ज उचलल्याची घटना समोर आली आहे.  २०१६ मधील या कर्ज प्रकरणात थकबाकीमुळे आता शेतकऱ्यांना नोटीस येत आहेत. त्यामुळे शेतकरी हादरले असून बँकेकडे संपर्क साधल्यावर त्यांनी कर्ज फेडण्यास सांगितले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला असता तत्कालीन बँक अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. 

या शेतकऱ्यांच्या नावे उचलले कारखान्याने कर्ज :  
कारखान्याने पन्हाळवाडी, बावी येथील अशोक पन्हाळे (१५ लाख ५३,२५२ रुपये), सचिन बिभीषण कांबळे (१५ लाख ५३,७४० रुपये), दयानंद पिंपळे (१६.५५ लाख), दत्तात्रय पिंपळे (१२ लाख) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सचिन निरफळ, सामदेव टकले, बापू ढेंगळे या शेतकऱ्यांच्या नावेही कर्ज उचलल्याची माहिती असून त्यांचा आकडा समजू शकला नाही.
 
 

कारखान्याकडून कर्ज फेडण्याची लेखी हमी
या प्रकारामुळे हादरलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी पंढरपूरला जाऊन कारखान्याचे चेअरमन भारत भालके यांची भेट घेतली. कारखान्याकडून सप्टेंबरअखेरपर्यंत सदरील शेतकऱ्यांच्या नावावरील कर्ज पूर्णपणे कारखान्यामार्फत भरण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.