आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’शेतकऱ्याच्या मुलाला शरद पवार यांच्या संस्थेत नोकरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - तेरणा साखर कारखान्याने कर्जाची रक्कम न भरल्यामुळे व्यथित झालेल्या कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी दीड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐन लोकसभा निवडणुकीत हा प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उस्मानाबादेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कसबे तडवळ्यात जाऊन ढवळे कुटंुबीयांची भेट घेतली तसेच त्यांच्या मुलाला स्वत:च्या संस्थेत नोकरी देण्याचे आश्वास दिले होते. त्यानुसार दिलीप ढवळे यांचा मुलगा निखीलला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेत नोकरी मिळाली असून, तो सोमवारी  रूजू झाला.


दिलीप ढवळे यांनी तेरणा साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतूकीसाठी करार केला होता.त्या करारानुसार वसंतदादा बँकेकडून कारखान्यामार्फत कर्ज घेतले होते. मात्र, ऊस वाहतूक केल्यानंतर कर्जाची परतफेड केली. उलट त्यांच्या जमिनीचा लिलाव पुकारण्यात आला. ६-७ वर्षे पाठपुरावा करूनही काहीही होत नसल्याने ढवळे यांनी गळफास घेतला. 

 

पवारांनी शब्द पाळला
दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार तडवळ्यात गेले होते. त्यांनी दिलीप ढवळे यांचा मुलगा निखिल याच्या शिक्षणाबद्दल माहिती घेऊन त्याला संस्थेत नेाकरीवर घेण्याचा शब्द दिला. निखिलला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नोकरी देण्यात आली असून, तो नुकताच रुजू झाला आहे.