आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा18 ते 24 नोव्हेंबर काळात चंद्र कर्क राशीतून तूळ राशीपर्यंत जाईल. या काळात चंद्रावर बृहस्पती, शनी आणि राहू-केतूची दृष्टी राहील. या 4 ग्रहांच्या प्रभावाने काही लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त काही राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. शनी आणि राहू-केतुमुळे काही लोकांचे कामामध्ये मन लागणार नाही. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास राहील इतर 5 राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.
जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
तुम्हाला अत्यानंद देणारी बातमी मिळू शकते. आठवड्याचा प्रारंभ प्रसन्नता देईल आणि व्यापारी याेजना कार्यान्वित हाेतील. सप्ताहाच्या मध्याला पैशाची आवक कमी हाेऊ शकते, पण नंतर पुन्हा परिस्थिती चांगली हाेईल. एखादे विशेष कार्य करण्यासाठी हर्षाेल्हास मनाला वाटेल.
व्रत : गायत्री मंत्राचा राेज दहा वेळा जप करा.
द्वितीय चंद्र आणि राशीस्वामीची दृष्टी असल्याने थाेडा त्रास हाेईल, पण नंतर यश मिळेल. प्रत्येक कामासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. सहकारी निराश करतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीने पुढे जावे लागेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबींमध्ये काही सुधारणा होईल.
व्रत : बुधवारी तुळशीची तीन पाने खा.
राहूबराेबर चंद्राची युती कायम आहे. चंद्र प्रथम, द्वितीय आणि तृतीय असल्याने पैशाची आवक वाढण्याबराेबरच उत्साही व कार्यप्रवण राहाल. कामाचा वेग वाढेल. यशस्वी व्यावसायिक सहलीचा याेग आहे. वैभव व दिखाऊपणावर तुमचा खर्च हाेण्याची शक्यता आहे.
व्रत : श्रीरामाचे दर्शन घ्या, नियमित मंदिरात जा.
तुमचा आत्मविश्वास भक्कम हाेईल आणि मुलांकडून आनंद व सहकार्य मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र द्वादश झाल्याने तुम्हाला खर्चाचा त्रास जाणवू शकताे पण सप्ताहाच्या मध्यापासून त्यात सुधारणा हाेण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला एेश्वर्यप्राप्ती हाेईल. श्रेष्ठ पराक्रम कराल.
व्रत : श्रीराम-सीतेचा जप करा. मंदिरात जा.
सप्ताहाच्या मध्यात चंद्राची गती आर्थिक बाबी कमजाेर करू शकते, याकडे विशेष लक्ष द्या. खर्चाचे प्रमाण जास्त वाढेल व कर्मचाऱ्यांची समस्या त्रास देऊ शकते. गुरुवारी संध्याकाळपासून परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येईल. आवश्यक यात्रेचा याेग निर्माण झाला आहे.
व्रत : शिवपार्वतीचे दर्शन करा, राेज मंदिरात जा.
अंतर्मनात खळबळ हाेईल व तथ्यहीन गाेष्टींचे विचार मनात येतील. अशा गाेष्टींचा त्याग करा कारण वेळ चांगली नाही. सर्व कामे वेळेवर पूर्ण हाेतील. सप्ताहाच्या शेवटी थाेडी पैशाची चिंता सतावू शकता, परंतु काही शुभ बातमी एेकायला मिळण्याची शक्यता आहे.
व्रत : श्री राधाकृष्णाचे दर्शन करा.
बुध हा मंगळ राशीत कायम आहे. जमीन अथवा घर खरेदी करण्याची इच्छा हाेईल व त्यात यशही मिळेल. न्यायालयात तुमची बाजू भक्कम हाेईल व वादात यश मिळेल. विराेधकांमध्ये भीती निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. कर्जातून मूक्त हाेण्याच्या दृष्टीने मार्ग सापडेल.
व्रत : गरजूंना मसूर डाळ दान करा.
अष्टमातील चंद्र तुमची आठवड्याची सुरुवात खराब करू शकताे. परंतु त्यानंतरच्या काळातील स्थिती तुमच्या बाजूने असेल. तुमची जुनी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील व नियमित लाभाच्या स्थितीमध्ये वाढ हाेईल. कामाच्या ठिकाणी असलेले अंतर्गत वाद मिटतील. तसेच तुम्हाला आठवड्यात सुखद बातमी एेकायला मिळू शकते.
व्रत : लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या.
गुरूच्या गाेचरमुळे असमताेल संपेल आणि अनेक सुधारणा हाेतील. कामकाजात मन रमेल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. विचार अधिक व्यापक हाेतील व गाेड व्यवहार कायम राहतील. विराेधकांचा प्रभाव निष्प्रभ करण्यात यशस्वी व्हाल आणि अज्ञातांचे भय संपेल.
व्रत : शिवाला बिल्वपत्र व मध अर्पण करा.
मंगळाच्या दृष्टीमुळे आनंदामध्ये वाढ हाेईल व वर्चस्व वाढेल, नवीन भेटी प्राप्त हाेतील. जमीन, कर्ज, न्यायालयीन कामांमध्ये यश मिळेल. आठवडाभरात अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक लाभ मिळेल, पण वर्चस्व कमी हाेणार नाही.
व्रत : निर्धनाला अन्न, वस्त्र, गरम कपडे दान करा.
आठवड्याची सुरुवात जाेरदार हाेईल. आनंद मिळेल आणि बेराेजगारांना काम मिळण्याची शक्यता आहे. मंगल कार्ये हाेतील व प्रसन्नतापूर्ण वेळ व्यतीत हाेईल. आठवड्यामध्ये चंद्राच्या सहयाेगाने अपार आनंद मिळेल. काेणता तरी माेठा लाभ मिळण्याची अपेक्षा.
व्रत : पक्ष्यांना तांदूळ द्या, त्यांच्यासाठी पाणी ठेवा.
आठवड्याच्या सुरुवातीस चाैथ्या स्थानातील चंद्र समीकरणे बिघडवू शकताे. याेजना बदलाव्या लागतील व सातत्याने प्रयत्न करावे लागतील. गुरुवारी वेळ तुमच्या बाजूने असेल. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील.
व्रत : मुंग्यांना साखर व राजगिऱ्याचे दाणे टाका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.