आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Supreme Court Reject The Petition Seeking The Change Of Name Of Aligarh Muslim University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या मागणीची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या मागणीशी संबंधित एक जनहित याचिका सर्वाेच्च न्यायालयाने साेमवारी फेटाळून लावली. याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गाेगाई यांच्या पीठाने याचिकाकर्त्याला फटकारत हे न्यायालयाचे काम नसल्याचे सांगितले. अॅड.रुद्रविक्रम सिंह यांनी ही याचिका दाखल केली हाेती. त्यात त्यांनी अलिगड विद्यापीठाचे नाव बदलण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी केली. शिक्षण सर्वांसाठी असताना नाव विशिष्ट धर्माशी संबंधित असल्यासारखे वाटते, असा युक्तिवाद मांडला हाेता.