आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चालणार खटला; पुनर्विचार याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नागपूर : २०१४ च्या िवधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणारी फडणवीस यांची पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळली. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आता खटला चालेल. 

नागपुरातील वकील अॅड. सतीश उके यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. दरम्यान, या निकालामुळे कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला असून फडणवीस यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेल्या प्रत्येक सुनावणीस हजर राहावे लागणार आहे. १० फेब्रुवारीला फडणवीस न्यायालयात हजरही झाले होते. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी आता ३० मार्चला होणार आहे.