आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तारक मेहता...\' मधून अजूनही का गायब आहे \'दया भाभी\'? त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे काहीच कळत नाही - प्रोड्यूसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दया भाभी तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये परत येणार की नाही? या प्रश्नामुळे त्यांचे फॅन्स सध्या चिंतेत आहेत. एकावर्षांपासून जास्त काळापासून दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणी शोमधून बाहेर आहे. ती नवरात्रीमध्ये मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. पण असे झाले नाही. आतापर्यंत दिशा प्रेग्नेंसी आणि बाळामुळे शोपासून दूर होती. पण आता तिला आई होऊन 11 महिने झाले आहे. पण तिचे रिल लाइफपासून दूर राहण्याचे कारण तिचे पती असल्याचे बोलले जात आहे. 

 

तिने कमबॅक करावे यासाठी तयार नाही पती?
- सूत्रांनुसार दिशाचे पती मयूर हस्तक्षेपत करत असल्यामुळे ती शोमध्ये कमबॅक करु शकत नाही. दिशाने काय कारण सांगितले? याचे उत्तर देताना असित (प्रोड्यूसर) म्हणाले की, "हे त्यांचे कौटुंबिक प्रकरण आहेत. तिच्या पतीला वाटते की, तिने काम करु नये, मग आम्ही काय करु शकतो. त्यांच्या घरात काय सुरु आहे, हे मला माहित नाही.  तिला काय करायचे काय नाही. तिच्या कुटूंबाला काय करायचे आहे. हा तिचा स्वतःचा निर्णय आहे, आम्ही लवकरच भेटू आणि त्यांच्याशी बोलू. कारण ती लवकरात लवकरच यावी असे प्रेक्षकांना वाटते. तिच्या माइंडमध्ये काय सुरु आहे हे मला माहित नाही. कदाचित ती तिच्या मुलीच्या देखरेखीत व्यस्त असेल."
- दिशाचे पती मयूर पाडिया मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटेट आहेत. त्यांचे लग्न 24 नोव्हेंबर 2015 रोजी झाले होते.

 

2008 पासून शोमध्ये आहे दिशा  
- दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. परंतू ती गेल्या 1 वर्षांपासून शोमध्ये नाही. अशा वेळी तिच्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
 

 

बातम्या आणखी आहेत...