Home | National | Other State | The Taj Mahal becomes first Indian monument with breastfeeding room

ताजमहालात बनणार ब्रेस्टफिडिंग रूम, अशाप्रकारची सुविधा देणारे देशातील पहिलेच स्मारक

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 24, 2019, 04:15 PM IST

जगातील इतर स्मारकांना प्रेरणादायी ठरेल मोहिम

 • The Taj Mahal becomes first Indian monument with breastfeeding room

  नॅशनल डेस्क- ताजमहल देशातील पहिले असे स्मारक असेल, जिथे महिलांना स्तनपानासाठी 'ब्रेस्टफीडिंग रूम' बनवल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त आग्र्याचा किल्ला आणि फतेहपूर सीकरीमध्येही अशी सुविधा दिली जाणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण(एएसआय) अधिकारी वसंत कुमार स्वर्णकार यांनी सांगितले की, आपल्या लहान मुलांना फिरण्यासाठी सोबत घेऊन येणाऱ्या महिलांना अनेक वेळेस स्मारकामध्ये असणाऱ्या पायऱ्यांच्या खाली मुलांना स्तनपान करावे लागत होते. त्यांची ही अडचण पाहून आम्हाला या गोष्टीची कल्पना आली.


  जगातील इतर स्मारकांना प्रेरणादायी ठरेल मोहिम
  स्वर्णकारनुसार, बेबी फीडिंग रूमचा फायदा त्या लाखो महिलांना होईल ज्या आपल्या मुलांना घेऊन येथे येतात. आपल्या बाळाला दुध पाजणे प्रत्येक आईचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.


  भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील 36 हजार स्मारकांमधून ताजमहल असे पहिले स्मारक असेल, जिथे अशा प्रकारची सुविधा देण्यात येईल. अशा प्रकारच्या सुविधा पाहून जगातील इतर स्मारकांना प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा ही सुविधा सुरू करतील.


  मागील वर्षी बेस्टफीडिंगसंबंधीत एक प्रकरण कोलकातामध्ये समोर आले होते. येथील एका मॉलमध्ये बाळाला पाजण्यासाठी महिलेला टॉयलेटमध्ये जायला सांगितले होते. यावर त्या महिलेने संबधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे महिला त्या मॉलसमोर उपोषणासाठी बसली होती.

Trending