आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : भरतनाट्यममध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुधाचंद्रन गेली अनेक वर्षे टीव्ही आणि चित्रपट जगतात सक्रिय आहे. तिने बरेच टीव्ही कार्यक्रम केले आहेत आणि आता ती 'तारा फ्रॉम सतारा' या मालिकेत नृत्य रिअॅलिटी शोच्या परीक्षकाची भूमिका साकारत आहे. तिच्याशी झालेली खास बातचीत...,
आता मिळत असलेल्या ऑफर्समुळे समाधानी आहेस का ?
होय, मी या ऑफर्समुळे खुश आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर माझ्या भूमिका खूप सशक्त असतात. कारण एकेवेळी मी फक्त नकारात्मक भूमिका करायचे, आता मात्र मी वेगवेगळ्या भूमिका करत आहे. एक अभिनेत्री म्हणून मी स्वत: वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून पाहत आहे. मी 'तारा फ्रॉम सतारा' मध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. मला रिअॅलिटी शोज आवडतात. 'सुपर डान्सर' हा माझा आवडता शो आहे. आम्हाला त्या शोमध्ये अनेक प्रतिभा पहायला मिळते. ते अप्रतिम आहे. मी तो शो कधीही चुकवत नाही. डान्स माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि म्हणूनच हा शो माझ्यासाठीही खूप खास आहे.
श्रीलेखा अयंगरची भूमिका तू का स्वीकारलीस ?
खरं तर, हा शो अगदी नवीन संकल्पनेसह समोर आला आहे, हा शो नाटक आणि वास्तवाचे मिश्रण आहे. टेलिव्हिजनवर प्रथमच अशी गोष्ट पाहायला मिळत आहे. नवीन संकल्पनेचा भाग बनून छान वाटले.
आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे ?
माझ्या पूर्वीच्या भूमिकांमध्ये आणि या भूमिकेत कोणतेही साम्य नाही, असे मला वाटते. मी यापूर्वी असे नाट्यमय कार्यक्रम बरेच केले आहेत. मी शोच्या रिअॅलिटी पार्टमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. माझे पात्र एक कडक परीक्षकाचे आहे, जे नृत्याबद्दल विचार करत असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मी स्वत: मालिका आणि रिअॅलिटी शोवर आधारित कोणत्याही भारतीय टीव्ही कार्यक्रमाचा भाग कधीच नव्हते. मात्र हा कार्यक्रम वेगळा आहे आणि माझे पात्रही. यातून नृत्य करण्याची आवड पुन्हा जागृत होत आहे. मला नृत्याची फार आवड आहे. मी नृत्य कधीही सोडू शकत नाही.
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विकासाविषयी तुझे काय मत आहे ?
ओटीटी प्लॅटफॉर्म वेगाने वाढत आहेत. त्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेळ आणि जागेचे स्वातंत्र्य आहे. त्याला काही मर्यादा नाहीत. या व्यतिरिक्त, प्रयोग करण्याची संधी मिळते. चॅनलमध्ये ते मर्यादित आहे. केवळ मर्यादित वेळेतच शो चालवले जातात, परंतु ओटीटीमध्ये ही समस्या सुटली आहे. खरं तर, टीव्हीचे वेगळे प्रेक्षक आहेत. महिला त्यांच्या आवडत्या मालिका पाहण्यासाठी घरचे काम लवकर करतात. कार्टून पाहण्यासाठी मुलेदेखील वेळेवर गृहपाठ पूर्ण करतात. पण ओटीटीमध्ये संपूर्ण कुटुंब स्क्रीनसमोर एकत्र येऊन पाहू शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.