आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृषभ-तूळ राशीचे स्वामी शुक्रने बदलली राशी, असा राहील 12 राशींवर प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 8 जानेवारीला रात्री 2 वाजता शुक्र ग्रहाने राशी परिवर्तन केले आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर तारीख बदलते म्हणजेच 9 जानेवारीला हे राशी परिवर्तन झाले आहे. शुक्राने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या ग्रहाने मित्र शनीच्या राशीमध्ये प्रवेश केला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शुक्र भोग आणि विलासतेशी संबंधित ग्रह आहे. शुक्र वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. हा ग्रह 2 फेब्रुवारीपर्यंत कुंभ राशीमध्ये राहील आणि त्यानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, 12 राशींवर शुक्राचा प्रभाव कसा राहील...

मेष - या राशीसाठी शुक्र शुभ राहील. धनलाभ होऊ शकतो. यश प्राप्त होईल. घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

वृषभ - स्वामी शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्या कार्यामध्ये वृद्धी करणारे राहील. वडिलांचे सहकार्य मिळेल. एखादे मोठे काम मिळेल, धन लाभाचे योग जुळून येतील.

मिथुन - या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. पराक्रम श्रेष्ठ राहील, योग्य पद्धतीने काम करू शकाल. यामुळे कामामध्ये यश तसेच मान-सन्मान प्राप्त होईल.

कर्क - या राशीसाठी शुक्र अशुभ स्थितीमध्ये राहील. चिंता राहतील. अज्ञात भीती आणि अडचणी वाढू शकतात.

सिंह - अविवाहित लोकांच्या लग्नाची बोलणी सुरु होईल. प्रेमामध्ये यश प्राप्तीचे योग आहेत. विवाहित लोकांना जोडीदाराकडून सुख मिळेल.

कन्या - शुक्र ग्रहांमुळे या राशीच्या लोकांचे आजार वाढू शकतात. शत्रू वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. कामामधे बाधा निर्माण होतील. काम पूर्ण होण्यास वेळ लागेल.

तूळ - या राशीच्या लोकांना अपत्य आणि नातेवाईकांकडून लाभ होऊ शकतो. नोकरीत लाभ होण्याचे योग आहेत. धनलाभाची संधी मिळेल.

वृश्चिक - या राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीतील शुक्र शुभ राहील. आईकडून लाभ मिळेल. कामामध्ये वृद्धी होईल. पराक्रमात सुधार होईल.

धनु - या राशीच्या लोकांना शुक्र ग्रहामुळे धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. धन-संपत्ती वाढू शकते. प्रसन्नता कायम राहील.

मकर - या राशीतून निघून शुक्राने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. एखाद्या मोठ्या कामामध्ये यश आणि मान-सन्मान मिळू शकतो.

कुंभ - या राशीमध्ये शुक्र आल्यामुळे कामामध्ये यश प्राप्तीचे योग जुळून येत आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील.

मीन - या राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च करावे लागू शकतात. धन संबंधित कामामध्ये सावध राहावे.