आंतरराष्ट्रीय / शिक्षकाने परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या डोक्यावर ठेवले बॉक्स

काही जणांनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्याला निलंबीत करण्याची मागणी केली

Sep 19,2019 11:47:27 AM IST

मॅक्सिको- एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना इकडे-तिकडे पाहणे आणि कॉपी करण्यापासून थांबवण्यासाठी त्यांच्या डोक्यावर कार्डबोर्डचे बॉक्स ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्डबोर्ड बॉक्स घालून परीक्षा देतानाचा विद्यार्थ्यांचा फोटो मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता हा एक वादाचा विषय बनला आहे. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पण काहींनी त्या शिक्षकाचे कौतुक केले आहे.


मॅक्सिको राज्याच्या टेलेक्ससलामध्ये बॅचलर्स कॉलेजच्या कँपस 01 मध्ये मागच्या आठवड्यात ग्रॅजुएशनची परीक्षा झाली. परीक्षेत विद्यार्थी एकमेकांचा पाहून लिहू नयेत यासाठी एल सबिनल कॉलेजचे डायरेक्टर लुइस जुआरेज टेक्सिसने त्या सगळ्यांना कार्डबोर्डचे बॉक्स घालून परीक्षा देण्यास सांगितले. दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी थायलंडमध्ये परीक्षेत कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना पेपरपासून बनवलेले हेलमेट घालण्यात आले होते.

X