आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काळ' या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज, या तारखेला प्रेक्षकांना घेता येणार थरारक अनुभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठीमध्ये वेगळी वाट चोखाळणाऱ्या 'काळ' या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर अलीकडेच प्रकाशित झाले आहे. मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण 'काळ'च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे.  सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. 

काळाचं ग्रहण फार वाईट, एकदा लागलं की सहजा सहजी सुटत नाही, या वेगळ्या प्रकारच्या आणि तुम्हाला घाबरवून टाकेल असा या चित्रपटाच्या थरारक अनुभवासाठी 24 जानेवारी 2020 पासून तयार रहा,  असेही दिग्दर्शक डी संदीप यांनी म्हटले आहे.  या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रंजीत ठाकूर, नितिन वैद्य (नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि डी संदीप (कांतिलाल प्रॉडक्शन्स), प्रवीण खरात आणि अनुज अडवाणी यांची आहे.