आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Temperature Of Plains States Is Lower Than Mussoorie Manali; The Coldest Day Of 118 Years In Delhi

मैदानी राज्यांचे तापमान सिमला- मसुरीपेक्षाही कमी; दिल्लीत ११८ वर्षांतील सर्वात थंड दिवस

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
दिल्लीत दाट धुके होते. यामुळे दृश्यमानता २५ मीटर, तर काही ठिकाणी शून्य झाली. यामुळे दिवसाही वाहनांचे दिवे सुरू होते. - Divya Marathi
दिल्लीत दाट धुके होते. यामुळे दृश्यमानता २५ मीटर, तर काही ठिकाणी शून्य झाली. यामुळे दिवसाही वाहनांचे दिवे सुरू होते.
  • हवामान खात्याने दिला नवीन वर्षात १३ राज्यांमध्ये पाऊस, गारा पडण्याचा इशारा
  • रुग्णालयात २०% रुग्ण वाढले, धुक्यामुळे अपघात
  • दिल्ली : अनेक भागांत दृश्यमानता शून्य झाली होती

नवी दिल्ली - यंदा थंडीने सर्व विक्रम मोडित काढले आहेत. दिल्लीसह अनेक मैदानी राज्यांमध्ये तापमान हिल स्टेशन्सपेक्षाही कमी झाले. गेल्या आठवड्याच्या शेवटी सिमला- मसुरीचे तापमान १४ अंश होते, तर रविवारी दिल्लीत १४ अंशांपेक्षा कमी, मप्रत १३.६, राजस्थानात ११ अंश, हरियाणात १२ अंश, गुजरातमध्ये १२.३ अंश आणि महाराष्ट्रात ५.३ अंश होते. तर, शनिवारी रात्रीही दिल्लीसह मैदानी राज्यांचे तापमान सिमला आणि मसुरीच्या तापमानापेक्षा दोन अंश कमी होते. हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण उत्तर भारतात धुके आहे. यामुळे सूर्य प्रकाश जमिनीवर येत नाही. यामुळेच मैदानी राज्य थंडीने कुडकुडत आहेत.

दिल्लीत १९०१ नंतर सर्वात थंड दिवस

हवामान खात्याने सांगितले की, सोमवार गेल्या ११८ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. दिवसाचे तापमान ९.४ अंश नोंदवण्यात आले. दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळपासूनच धुके होते. यामुळे हवाई, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.पुढे काय : दोन दिवस पाऊस, गारा, थंड दिवस


हवामान खात्याने मंगळवारी दिल्ली, यूपी, पंजाब, हरियाणा आणि चंदिगडमध्ये अती थंड दिवसाचा इशारा दिला आहे. बिहार, मप्र, पूर्व यूपी आणि राजस्थानात थंड दिवसाचा इशारा आहे. सात राज्यांमध्ये शीत लहर राहील. १३ राज्यांमध्ये दाट धुके असेल. तसेच, मप्र, विदर्भ, छत्तीसगड व राजस्थानात गारा-पावसाची शक्यता आहे. तर, १ आणि २ जानेवारी दरम्यान यूपी, पंजाब, हरियाणा, चंदिगड आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता अाहे. २ जानेवारीला दिल्ली, पंजाब, हरियाणासह १३ राज्यांमध्ये पाऊस व गारांचा अलर्ट आहे.दिल्ली : अनेक भागांत दृश्यमानता शून्य झाली होती


धुक्यामुळे दिल्लीतील अनेक भागांत दृश्यमानता शून्य झाली होती. यामुळे ५६० पेक्षा जास्त उड्डाणे उशिरा झाली. २१ डायव्हर्ट, तर ५ उड्डाणे रद्द करण्यात आली. तर, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. ३० पेक्षा जास्त रेल्वेही उशिरा होत्या, २५ रद्द करण्यात आल्या.रुग्णालयात २०% रुग्ण वाढले, धुक्यामुळे अपघात

सततच्या थंडीचा परिणाम रुग्णांवर होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमधील रुग्णालयात श्वास आणि त्या संदर्भातील आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एम्सच्या ओपीडीत २०% रुग्ण वाढले आहेत. तर, ग्रेटर नोएडात धुक्यामुळे अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला
.