आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीचा पोत घसरला; सामूत वाढ, सेंद्रिय कर्बच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रताप गाढे 

जालना - रासायनिक खताचा बेसुमार वापर, मोकाट सिंचन पद्धतीने क्षमतेपेक्षा पिकांना जास्त पाणी देणे, नैसर्गिक प्रक्रियेला फाटा देत कृत्रिम पध्दतींचा वापर करणे शेतकऱ्यांना आता महागात पडायला लागले आहे. परिणामी मातीचा पोत घसरला असून सरासरी असलेल्या प्रमाणापेक्षा सामूत वाढ झाली असून सरासरीपेक्षा ८.१० वर पोहोचला आहे. सेंद्रिय कर्ब ०.४० वरून थेट ०.२३ असे जवळपास ५० टक्क्यांनीच घट झाली आहे. जालना मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाकडून २०१५ पासून आजपर्यंत विविध योजनेतून ९ लाख ३९ हजार ५० शेतकऱ्यंाचे शेती नमुने तपासले असून मृद आरेाग्य पत्रिका दिली आहे. ही बाब राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मागील पाच वर्षांपासून तपासणी केलेल्या माती परीक्षण अहवालातून पुढे आले आहे.आधुनिक शेतीच्या नावाखाली व अधिक उत्पादन घेण्याच्या चढाओढीत शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करत आहेत. याचबरोबर एक पीक पद्धतीमुळे शेतीची सुपीकता खालावली आहे. पिकांसाठी समाधानकारक पावसाप्रमाणेच जमिनीची सुपीकताही महत्त्वाची आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी शेतकरी व कृषी विभागाची आहे. त्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करून शेतकऱ्यांना सुपीकतेविषयी विविध उपक्रमांतून माहिती दिली जाते. पण त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे रासायनिक खतांचा क्षमतेपेक्षा अति वापर, सर्वांचीच एक पीक पद्धत, सेंद्रिय खताचा अत्यल्प वापर आदी कारणांमुळे जिल्ह्यातील शेतीचा सेंद्रिय कर्ब ०.२० ते ०.२३ पर्यंत खालावला आहे. नत्राचे प्रमाणही खूपच कमी आहे. इतर अन्नघटकांचीही कमतरता आहे. त्यामुळे शेतीच्या पृष्ठभागातील गांडूळसारखे शेतीमित्र जिवाणू नष्ट झाले आहेत. खुल्या प्रमाणात पाणी देणे शिवाय खतांचा अतिरिक्त वापर, पावसाचे पाणी वाहून जाणे यामुळे जमीन चोपण होण्याबरेाबरच क्षारयुक्त झाली आहे. परिणामी आम्लतेचे प्रमाण वाढले आहे. जमिनीत हवा खेळून राहत नाही. जलपुनर्भरण होत नाही. पाण्याबरोबर माती वाहून जाते. कपाशी किंवा मका हे एकच पीक शेतकरी घेत असल्याने खर्च अधिक व उत्पादन कमी होत आहे. जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर पोत आणखी घसरू शकतो.सेंद्रिय कर्बातही झाली घट 

जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचे साधारणत: प्रमाण हे ०.४० ते ०.६० इतके अपेक्षित अाहे. मात्र, हे प्रमाण ०.२३ इतके झाले आहे.  स्फुरद हे १४ ते २१ किले असणे अपेक्षित असताना प्रमाण ११.३७ किलाे इतके झाले आहे. याबरेाबरच पालाशचे प्रमाणात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यंानी माती परीक्षण करून दिलेल्या सल्ल्यानुसारच खतांचा वापर केल्यास हे जमिनीच्या आरेाग्यात सुधारणा होईल.सोळा  महत्त्वाचे अन्नघटक असे 
 
हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मंगल, तांबे, जस्त, मॅलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन या सोळा अन्नघटकांच्या उपलब्धतेवर सुपीकता अवलंबून आहे. हे अन्नघटक टिकवून शेतीचे आरोग्याचे संवर्धन व संरक्षण करणे शेतकऱ्यांच्याच हातात आहे. याचा समताेल ठेवल्यास जमिनीचे आरेाग्य समतोल राहणार आहे.जालना जिल्ह्यात पाच वर्षांत नमुने तपासून शेतकऱ्यांना आरेाग्य पत्रिका

  • शाश्वत शेती अभियान २०१५-१७ पहिल्या टप्प्यात जमीन आरेाग्य पत्रिका ४,५४, १८२
  • शाश्वत शेती अभियान २०१७-१९ दुसरा टप्पा जमीन आरेाग्य पत्रिका ४,८०,४७८
  • शाश्वत शेती अभियान (पथदर्शी प्रकल्प) २०१९-२० मध्ये जमीन आरेाग्य पत्रिका ४,३९०

दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करावे 

मागील पाच वर्षांचे प्रमाण पाहता जिल्ह्यातील शेतीच्या आरेाग्यात बिघाड होत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करत आहेत. शिवाय मोकाट पध्दतीने दिल्या जाणाऱ्या पाण्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढल्याने जमिनीचा सामु वाढला आहे. शेतकऱ्यांनी हिरवळीची खते वापरावी, सेंद्रिय खते, उडीद, मूग, शेवरी यासारख्या पिकांची लागवड करावी. शिवाय दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करावे. -  एस.एस.भवरे, जिल्हा मृद व मृद चाचणी अधिकारी, जालना   बातम्या आणखी आहेत...