आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकार आज येणार उपराजधानीत, आघाडीतर्फे होणार मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरच्या अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर सत्तेवर आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी प्रथमच उपराजधानीत दाखल होत आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रथमच नागपुरात दाखल होत असलेले उद्धव ठाकरे यांच्या जंगी स्वागताची जय्यत तयारीही महाविकास आघाडीने केली आहे.

सत्तापक्ष आणि विरोधकांमधील राजकीय कटुता लक्षात घेता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित होणाऱ्या पारंपरिक चहापानावर विरोधक बहिष्कार घालणार की कसे, याबद्दलची राजकीय उत्सुकता नागपुरात दिसून येत आहे. रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आगमन होत आहे.
१४ संघटनांचे मोर्चे धडकणार : सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष भाजपमधील राजकीय कटुता पाहता भाजप चहापानावर बहिष्कार घालणार की कसे, याबद्दल उत्सुकता आहे. सत्तापक्ष आणि विरोधकांमधील ताणतणावाने अधिवेशन गाजण्याची शक्यता दिसत असून त्याचे संकेत भाजपने शनिवारी नागपुरात सरकारविरोधात केलेल्या आंदोलनातून मिळाले आहेत.

शेतकरी कर्जमाफीकडे लक्ष

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकार अधिवेशनात नेमके काय जाहीर करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.