आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंत पाडून काेंडवाड्यातून पाच जनावरे चोरट्यांनी पळवली

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कन्नड - शहरात स्वामी समर्थ मंदिरातील चोरीची घटना ताजी असतानाच कन्नड नगर परिषदेच्या आवारात असलेल्या कोंडवाड्यातुन अज्ञात चोरांनी (दि.४) गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कोंडवाड्यात बंदिस्त केलेले अकरा मोकाट जनावरांना पैकी पाच जनवारे भिंत पाडून पळविले  व यापैकी एका गाईला अमानुषपणे मारहाण करून पोबारा केला.या घटनेमुळे कन्नड शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेने शहर पोलिसात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. शहरात सहा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला असताना देखील शहरात चोरीच्या अनेक घटना होत आहे. नगरपरिषद हद्दीत असलेल्या कोंडवाड्यातून जनावरे पळून नेतांना एका गाईला आतिशय अमानुषपणे मारहाण केली गेली. या गाईला एका नालीत डांबून तिच्या डोक्यात लोखंडी खांब टाकुन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जखमी गाईवर नगर परिषद उपचार करीत आहे. हे पळवून नेलेले जनावरे हे बेकायदेशीर गोमास विक्री करण्यासाठी चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.जनावरांच्या मालकांनी खबरदारी घ्यावी


नगर परिषदेच्या हद्दीत मोकाट जनावरे आढळल्यास जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील व ठराविक कालावधी सोडून न नेल्यास पकडलेल्या जनावरांचा लिलाव करण्यात येईल. नागरिकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट फिरणार नाही याची खबरदारी घ्यावी. -नंदा गायकवाड,  मुख्याधिकारी.