आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी नकार दिल्यास पाहून घेण्याची दिली धमकी: एकतर्फी प्रेम; युवकाविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीला सोशल मीडियाव्दारे युवकाने छायाचित्र पाठवले, या छायाचित्रात काही युवकासोबत मी दिसतो आहे, ते माझे मित्र आहेत, तु लग्नाला नकार दिल्यास हे मित्र तुला पाहून घेतील, अशी धमकी एका युवकाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीला दिली. या प्रकरणी अल्पवयीन युवतीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोन मोबाईल क्रमांकधारकाविरुध्द गुन्हा दाखल केला. शहरात यापूर्वी एकतर्फी प्रेमातून एका युवतीचा बळी तर दोघींवर जीवघेणे हल्ले झाले. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.


गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीच्या आईच्या मोबाईलवर ११ ते १७ नोव्हेंबरदरम्यान दोेन मोबाईल क्रमांकावरून संदेश प्राप्त झालेत. त्यामध्ये लिहिले होते की, ऑनलाईन ये, मला बोलायचे आहे. कॉल रिसीव्ह कर. वारंवार येणाऱ्या या मॅसेजमुळे युवती घाबरली. याचदरम्यान युवतीला एका मोबाईल क्रमांकावरून एक छायाचित्र आले, या छायाचित्रात काही मुलांचा ग्रुप फोटो होता

बातम्या आणखी आहेत...