आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पक्ष एकत्रच राहू; सरकारचा पराभव करू, काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गुपचूप अंधारामध्ये राष्ट्रपती राजवट उठवून शपथविधी उरकणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने लिहली जाणारी घटना आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आजही एकत्र आहेत, पुढे एकत्र राहतील आणि बहुमत सिद्ध करताना नव्या सरकारचा पराभव करतील, असे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी स्पष्ट केले.

राज्यात भाजप बरोबर जाऊन जाऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पहाटे सरकार स्थापन केले. या घडामोडी संदर्भात काँग्रेसने आपली शनिवारी भूमिका स्पष्ट केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी दुपारी दोन वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. त्यात बोलताना पटेल म्हणाले की, राज्यपालांनी फडणवीस यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे याची कोणतीही खातरजमा केली नाही. चुपचाप आणि रात्रीच्या अंधारात सरकारला शपथ दिली. त्यामुळे इसमे कुछ तो गलत हुआ है, ऐसी मुझे बू आ रही है, असे ते म्हणाले.

आमदार फुटणार नाही 


काँग्रेसचे ४४ आमदार आहेत, पैकी ४२ आमदार मुंबईत उपस्थित असून दोन आमदार गावी आहेत. काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पटेल यांनी केला. भारतीय जनता पक्षाला विधिमंडळात शिकस्त द्यायला द्यायला काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष समर्थ आहेत. जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष या नव्या सरकारचा पराभव नक्की करू. त्यासाठी रणनीती एकत्रित बसून करणार आहोत, असे पटेल यांनी सांगितले.

मतभेद नव्हते


तीन पक्ष बैठका घेत होते, त्यात कोणत्याही मुद्द्यावर विशेष मतभेद नव्हते. साध्या साध्या गोष्टी ठरवायच्या होत्या, पण त्यात विशेष अडचण येणार नव्हती, असे सांगून दुपारी १२ वाजता तिन्ही पक्षांची पुन्हा बैठक होणार होती. आणि नंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा काल शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता, अशी माहिती पटेल यांनी दिली. या पत्रकार परिषदेला मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.

उशीर केला नाही
 
काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसंदर्भात कोणताही विलंब झालेला नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जेव्हा फोन केले, त्याला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रतिसाद प्रतिसाद दिल्याचे अहमद पटेल म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...