Home | Sports | From The Field | The three-time finalist Sri Lanka are almost out of semi-finals

तीन वेळचा फायनलिस्ट श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर, पण श्रीलंका संघ अशा प्रकारे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकताे

वृत्तसंस्था, | Update - Jun 29, 2019, 10:34 AM IST

द. आफ्रिकेने श्रीलंकेचे गणित चुकवले, ९ गड्यांनी विजय

 • The three-time finalist Sri Lanka are almost out of semi-finals
  ४८ व्या षटकादरम्यान मधमाशा मैदानावर आल्या; खेळाडू व पंच मैदानावर झोपले

  चेस्टर ली स्ट्रीट - श्रीलंका संघ विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ९ गड्यांनी पराभूत झाला. श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाला. तीन वेळचा फायनलिस्ट श्रीलंकेचा हा तिसरा पराभव ठरला. श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने ३७.२ षटकांत एक गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. उपांत्य फेरीतच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या श्रीलंकेचे गणित चुकवले. सामनावीर ठरलेला वेगवान गोलंदाज प्रिटोरियसने २५ धावा देत ३ विकेट घेतल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाबाद ९६ धावा आणि हाशिम आमलाने नाबाद ८० धावांची खेळी केली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी नाबाद १७५ धावांची भागीदारी रचली.

  परेरा व फार्नांडोची भागीदारी
  दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रबाडाने पहिल्या चेंडूवर करुणारत्नेला बाद केले. परेरा आणि फर्नांडोने दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. ही डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. फर्नांडो आणि परेरा बाद झाल्यानंतर टीम ढेपाळली. धनंजयाने २४ आणि तिसारा परेराने २१ धावा केल्या. मॅथ्युजने ११ धावा आणि जिवन मेंडीसने १८ धावांचे योगदान दिले. टीमला २० धावा अतिरिक्त मिळाल्या. रबाडाने दोन विकेट घेतल्या. डुमिनी आणि फेहलुकवायोने प्रत्येकी एक बळी घेतला.

  प्रिटोरियसचे ४६ चेंडू निर्धाव

  सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज प्रिस्टोरियसने एकूण ४६ चेंडू निर्धाव टाकले. त्याने २५ धावा देत ३ गडी बाद केले.हा चालू विश्वचषकात कोणत्याही गोलंदाजातर्फे सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आहे.

  श्रीलंका संघ अशा प्रकारे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकताे

  श्रीलंकेचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत. वेस्टइंडीज आणि भारत आपले उर्वरित सामने जिंकले. पाकिस्तान आणि बांगलादेश टीम प्रत्येकी एक-एक सामना गमावला तर.

  पहिल्या १० षटकांत श्रीलंका वेगवान

  विश्वचषकात आतापर्यंत श्रीलंकाने पहिल्या १० षटकांत सर्वात वेगवान धावा काढल्या. मधल्या षटकांत सर्वात कमी धावा काढल्या.

Trending