आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजपासून मराठमाेळ्या कबड्डीच्या चित्तथरारक लढतींचा थरार:4 नाेव्हेंबरला फायनल मुकाबला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर -येथील मैदानावर अाज बुधवारपासून मराठमाेळ्या कबड्डी स्पर्धेच्या चित्तथरारक सामन्यांचा थरार रंगणार अाहे. ये‌थे ६६व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत राज्यातील एकूण ४७ संघ सहभागी झाले अाहेत. यात  २५ पुरुष अाणि महिलांच्या २२ संघांचा समावेश अाहे. या स्पर्धेचा फायनल मुकाबला ४ नाेव्हेंबर राेजी हाेईल. 


महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच-सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा  ३१ऑक्टोबर ते ४नोव्हेंबरदरम्यान रंगणार अाहे. यासाठी खास अाकर्षक अाणि अत्याधुनिक स्वरुपाचे  मातीचे सहा मैदाने तयार करण्यात अाले. या  स्पर्धेतून अागामी राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे महाराष्ट्राचे महिला अाणि पुरुष संघ निवडले जातील. यासाठी राज्यातील ६०० खेळाडू या स्पर्धेत अापली चुणुक दाखवणार अाहेत. 

 

स्पर्धेची वैशिष्ट्ये
- स्पर्धेच्या दाेन्ही गटांत राज्यातील ४७ संघ झाले सहभागी, ६०० पेक्षा अधिक खेळाडू दाखल.
- स्पर्धेत महिलांचे २२ अाणि पुरुषांचे २५ संघ.
- स्पर्धेसाठी ७० तज्ज्ञ पंचांची खास नियुक्ती.
- दाेन्ही गटांतील सामन्यांसाठी भव्य अशी अत्याधुनिक स्वरूपाची सहा मैदानेही तयार. 
- पाच दिवस रंगणार सामन्यांचा थरार, ४ नाेव्हेंबरला दाेन्ही गटांचा अंतिम सामना रंगणार.
- कबड्डीप्रेमींसाठी खास गॅलरीची व्यवस्था करण्यात अाली, साेबतच सामन्यांचा थरार थ्रीडी स्क्रीनच्या टीव्हीवरही दिसणार अाहे.

 

स्पर्धेच्या ठिकाणी खास १६८० चौरस फुटांचे मुख्य स्टेज
स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठीही खास व्यवस्था करण्यात अाली. यासाठी ३७० फूट प्रेक्षक गॅलरी, ३१२  फूट विशेष अतिथींसाठीची प्रेक्षक गॅलरी, १६८० चौरस फुटांच्या मुख्य स्टेजची उभारणी सुरू आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या सहा कबड्डी मैदानांची जय्यत तयारी सुरू केली आहे.

 

६०० खेळाडू सहभागी १०,००० प्रेक्षक क्षमतेची गॅलरी 
यंदाच्या या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत राज्यभरातून ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी मातीची कबड्डीची सहा मैदाने तयार करण्यात येणार असून १०,००० प्रेक्षक क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. स्पर्धेच्या मैदानाची तयारी सुरू झाली आहे.

 

स्पर्धेतील सहभागी संघ   
पुरुष विभाग
अ गट : पुणे, जालना, बीड,  हिंगोली. 
ब गट :  कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर. 
क गट : ठाणे, रायगड,परभणी, सातारा. 
ड गट : सांगली, अहमदनगर, जळगाव, सिंधुदुर्ग. 
इ गट : मुंबई उपनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, नाशिक. 
फ गट : नंदुरबार, मुंबई शहर, सोलापूर,  उस्मानाबाद, नांदेड.
 महिला विभाग 
अ गट : मुंबई उपनगर,  अहमदनगर,  सोलापूर. 
ब गट : पुणे,  सातारा,  उस्मानाबाद.
क गट : कोल्हापूर,  रायगड, औरंगाबाद, जळगाव. 
ड गट : रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग,  धुळे. 
इ गट : मुंबई शहर,  नाशिक,  बीड,  परभणी. 
फ गट : ठाणे,  पालघर,  जालना, लातूर.

 

बातम्या आणखी आहेत...