आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७ हजार रू. वाचवण्यासाठी प्रवाशांनी लढवली वेगळी शक्कल; तिकीट काढले जयपूरचे, उतरले जोधपूरला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - मुंबई ते जोधपूर व्हाया जयपूर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून (एआय ६४५) मंगळवारी दुपारी दोन प्रवासी विमान कर्मचाऱ्यांना न सांगताच जोधपूरला उतरले. मुंबई ते जोधपूर या थेट प्रवासाचे भाडे जास्त आहे. यामुळे या दोन प्रवाशांनी जयपूरचे स्वस्त दराचे तिकीट काढले. त्यानंतर जोधपूरला विमान थांबले तेव्हा ते दोघेही जोधपूरला उतरले.  काही वेळानंतर दोन प्रवासी गायब असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. तपासांती दोघांची ओळख पटली. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना विमानतळावर बोलावले. परंतु या प्रवाशांनी आपले नातेवाईक आजारी असल्याचे सांगत तेथे येण्यास नकार दिला.  


सुरक्षेच्या कारणामुळे विमानातील सर्व प्रवाशांचे बोर्डिंग पास पुन्हा देण्यात आले. यामुळे जयपूरकडे जाणाऱ्या विमानास पाऊण तास उशीर झाला. दुपारी १२.३० वाजता विमानाने उड्डाण केले. तत्पूर्वी हे विमान मुंबईहून सकाळी ११.३५ वाजता जोधपूरला पोहोचले होते. उर्वरित प्रवाशांसह रात्री ११.४५ वाजता जयपूरकडे जात असताना विमानातील प्रवाशांची मोजदाद करण्यात आली. तेव्हा दोन प्रवासी कमी भरले. त्यामुळे विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. विमानाच्या तिकिटाचे दर उपलब्धतेनुसार बदलत असतात. गुरुवारी मुंबई ते जयपूरचे तिकीट १०,०३० रुपयांत मिळते, तर मुंबई ते जोधपूरचे तिकीट १७,६९५ रुपयांत मिळत होते.

बातम्या आणखी आहेत...