आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर निखळल्याने सिल्लोडमध्ये काळीपिवळी उलटली, दहा जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भराडी : भरघाव काळीपिळी जीपचे पुढील टायर निखळल्याने जीप रस्त्याच्या खाली जाऊन खड्यात उलटून झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सिल्लोड-भराडी रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ झाला. जखमीत आठ शिक्षकांचा, तर एक महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अपघातील सहा शिक्षक तालुक्यातील तळणी येथील एका खासगी शाळेत, तर दोन शिंदेफळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. हे सर्व शिक्षक दररोज सिल्लोडहून ये-जा करतात. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे काळीपिळी जीप (एमएच- २०-१४९) हे शिक्षक जात असताना धानोरा फाट्याजवळ जीपचे पुढील टायर निखळले. यामुळे चालकाचा ताबा सुटला व जीप रस्त्याच्या खाली जाऊन खड्यात उलटली. सुदैवाने खड्ड्यात पाणी साचलेले होते. यामुळे कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघात होताच शेजारील शेतकरी मदतीला धावले. त्यांनी वाहन चालकांच्या मदतीने जखमींना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीट जमादार दयानंद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची नावे

संगीता मोरे (४२), अर्जुन राठोड (३०), राजश्री लांडगे (३०), रेखा टाकसारे (३१), ऋषिकेश दगडघाटे, कविता दगडघाटे (३५), दीपाली क्षिरसागर (४०), शांताराम गायकवाड, राजेंद्र शिंदे (३८) सर्व रा. सिल्लोड, रूपाली अंभाेरे (२९ रा. डोंगरगाव) असे जखमींची नावे आहेत. दरम्यान, अपघात होताच चालक पळून गेल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.
 

बातम्या आणखी आहेत...