आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पावसाने घातले थैमान; सराफा भागातील दुकानांत शिरले पाणी, वाहनेही पाण्याखाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक शहरात आज (रविवारी) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील जुने नाशिक, द्वारका, शालीमार, इंदिरानगरसह विविध परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील सराफा भागातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून दुकानांत पाणी शिरले आहे. तसेच अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत.
 

ग्रामदैवताच्या यात्रेवरही परिणाम
या मुसळधार पावसामुळे शहराचे ग्राम दैवत असलेल्या कालिंका यात्रोत्सवालाही पावसाचा फटका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांसह यात्रेत दुकाने थाटलेल्या दुकानदारांची तारांबळ उडाली. सुमारे दोन तासापासून सुरु असलेल्या पावसामुळे नाशिकमधील शिवाजी स्टेडियममध्ये पाणी साचले आहे. यामुळे स्टेडियमला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.