आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील व्यापारी बंद न पाळता काळ्या फिती लावून बंदमध्ये सहभागी होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विविध संघटना, पक्षांकडून अनेक प्रश्नांवर बंद व आंदोलन करण्यात येते. यात व्यापारी, उद्योजक, दुकानदार सर्वजण आपापले व्यापार व उद्योग बंद ठेवून सहभागी होतात. त्यामुळे राष्ट्राचे मोठे नुकसान होते. ग्राहकांचे हाल होतात. व्यापारी, दुकानदार, उद्योजक नेहमी सहकार्याची भूमिका ठेवून बंद, आंदोलनात सहभागी होतात. मात्र यापुढे विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी पुकारलेल्या बंदमध्ये आपापले व्यापार, व्यवसाय बंद न ठेवता काळ्या फिती लावून सहभागी होऊन सहकार्य करतील, अशी घाेषणा महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने केली आहे.  संघटनेचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले, गेल्या ५ वर्षांत व्यापारी, दुकानदार, उद्योजकांनी त्यांच्या स्वतःच्या मागण्यांसाठीसुद्धा अत्यंत कमी वेळाच बंद अथवा आंदोलने केली आहेत. त्यामुळे देशहित लक्षात घेता, भविष्यात होणाऱ्या कुठल्याही बंद अथवा आंदोलनात, व्यापारी व उद्योजक हे काळ्या फिती लावून सहभागी होणार असल्याचे मंडलेचा यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...