Religion / दक्षिण भारतात प्रचलित आहे केळीच्या पानावर जेवण करण्याची परंपरा, याने होतो लाभ

केळीच्या पानांवर असलेले अँटीऑक्सीडन्ट आपल्याला आजारांपासून वाचवतात 

दिव्य मराठी वेब

Jul 23,2019 04:59:00 PM IST

जीवन मंत्र डेस्क : भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे की, दक्षिण भारतामध्ये केळीच्या पानावर भोजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेने आपल्या स्वास्थ्याला खूप लाभ मिळतो. जाणून घ्या ज्योतिषाचार्य आणि भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या प्राचीन परंपरेशी निगडित काही खास गोष्टी...

केळीला मानले जाते पूज्य...
केळीला पवित्र आणि पूज्य झाड मानले जाते. केळीच्या पानापासून मंडपदेखील बनवले जातात. भगवान सत्यनारायणच्या कथेमध्ये या पानांचे विशेष महत्व आहे. वास्तुनुसार केळीचे झाड तर घरामध्ये किंवा घरासमोर असेल. तर घराचे अनेक दोष दूर होऊ शकतात.

केळीच्या पानात असतात पोषक तत्व...
केळीच्या पानावर गरम जेवण वाढले जाते. ज्यमुळे पानांवर असलेले पौषक तत्व जेवणात उतरतात. केळीच्या पानात असलेले तत्व स्वास्थ्यला लाभडौक असतात. रोज केळीच्या पानावर जेवण केल्याने केस स्वस्थ राहतात. चेहऱ्यावरील पुरले फोडे दूर होतात. पोटाशी संबंधित सर्व आजार दूर राहतात. केळीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सीडेंट असतात, जे पालेभाज्यांमध्ये असतात. जो फायदा केली खाल्याने होतो, तोच फायदा केळीच्या पानांवर जेवल्यानेही मिळतो.

प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये ठेवलेले अन्न आपल्या स्वास्थ्यासाठी चहले नसते. धातूंच्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठीही साबणासारख्या केमिकलचा उपयोग केला जातो. हे केमिकलदेखील आपल्या स्वास्थ्यासाठी नुकसानदायकच असते.

X
COMMENT