आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब : २४०० वर्षांची घोडेस्वारीची परंपरा अद्यापही कायम; सहा गिनीज विक्रम केल्याचाही दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घोडेस्वारांनी मैदानात टेंट पेगिंग महोत्सवात भाग घेतला आहे. त्याचे खानेवाल जिल्ह्यातील तुलुंबा गावात आयोजन करण्यात आले आहे. पोलोसारख्या या खेळाला २४०० वर्षांची परंपरा आहे. या खेळात चेंडूच्या जागी लाकडी ब्लॉक असतो. आयोजनातील स्थानिक नेते शौकत हयात बोसान म्हणाले, हा सामान्य खेळ नाही. हा महागडा व धाेकादायक आहे. तो तरूण खेळतात. यात सहभागी होणाऱ्यास घोडेस्वारीसोबतच तलवारबाजीही यायला हवी. 


किंबहुना तो त्यात तरबेज असायला हवा. थोडी चूकही कायमचे अपंगत्व आणणारे ठरू शकते. शीख योद्धा टेंट पेगिंगला युद्ध कौशल्याच्या रुपात आजमावत असत, असे ऐतिहासिक दाखले मिळतात. त्यातून गनिमांच्या तंबूंना उखडवून टाकण्याचे काम केले जात असते. तंबू कोसळल्याने शत्रू एकप्रकारे कैद व्हायचा. त्यानंतर दुसरी तुकडी त्यांच्यावर हल्ला करून परतत असे. तेव्हापासूनच हा खेळ बनला. पाकिस्तानातील ही परंपरा इतर काही देशांतही पाहायला मिळते. त्यामुळेच या स्पर्धेत देशाेदेशींचे स्पर्धकही सहभागी होतात. मैदानी खेळात तरूणांचा अधिक भरणा असतो. 

 

सहा गिनीज विक्रम केल्याचाही दावा

> महोत्सवाचे आयोजक म्हणाले, २७ मार्च रोजी झालेल्या आयोजनादरम्यान सहा जागतिक विक्रमांची नोंद झाली. त्यात १२० घोडेस्वारांनी १६६ सेकंदात अंतिम रेषा पार केली. त्यात एकाचवेळी ९० लाकडी ब्लॉक हिट करणे अपेक्षित आहे.
 

> आयोजकांनी गिनीज बुकमध्ये नोंद केल्याचा दावा केला.
> टेंट पेगिंग इंटरनॅशनल फेडरेशनची २०१३ मध्ये स्थापना. भारत व पाकिस्तानसह २९ देश सदस्य.
> अत्यंत थरारक अशा या खेळाला पाहण्यासाठी पंचक्रोशीसह परदेशी नागरिकांचीही गर्दी दिसते. 

बातम्या आणखी आहेत...